शरीरातले सर्व विषारी पदार्थ असे काढा बाहेर.! वर्षातून एकदा तरी शरीर अशाप्रकारे स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे.! प्रत्येकाने एकदा तरी करावे हे कामे.!

आरोग्य

मित्रांनो आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या दैनंदिन आहारामध्ये देखील खूप बदल झाले आहेत. अनेकदा बाहेरचे खाणे तसेच मैदा, बेकरी प्रॉडक्ट खाणे यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक विषारी घटक साठत राहतात. परिणामी आपले पोट खराब होऊन अनेक प्रकारच्या समस्या आपण हाताने ओढवून घेतो. ज्यामध्ये लठ्ठपणा मधुमेह रक्तदाब हृदयविकार असा धोका असे एक ना अनेक गंभीर समस्या आपल्याला जडण्याची शक्यता असते.

त्यात नियमित व्यायामाचा अभाव बैठी जीवनशैली अजूनच भर घालतात. तुम्ही डीटॉक्स हा शब्द अनेक लोकांच्या तोंडी ऐकला असेल. परंतु नेमकी प्रक्रियेबद्दल फार कमी लोकांना माहीत असते. खरतर डिटॉक्सीफिकेशनच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील घाण स्वच्छ करत असतो. डिटॉक्स ही आपल्या शरीराला आणि मेंदूला निरोगी ठेवण्याची एक प्रक्रिया आहे.

यामुळे तुम्हाला येणारा मानसिक तणाव आणि इतरही आजार दूर राहतात. तसेच यामुळे आपल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळते व ताजेतवाने वाटते. बॉडी डिटॉक्सीफिकेशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आज आपण आतडे कसे डिटॉक्स करायचे ते पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला वाढलेले वजन नियंत्रणात ठेवता येते. पचना संबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतात तसेच अकारण येणारा तणाव, आळस देखील होतो गायब.

हे वाचा:   चेहऱ्यावरचे पिंपल्स काही तासातच कायमचे नष्ट होतील.! हा गावरान उपाय अनेक लोकांना माहिती नाही त्यामुळे लोक घालत आहे खूप सारे पैसे.!

तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते. थोडक्यात यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल नियमितपणे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकणे किती महत्त्वाचे आहे. यामुळे संपूर्ण शरीर शुद्ध होण्यास मदत होते. दरम्यान तुमचा आहार सात्विक पौष्टिक आणि संतुलित असावा. बदलते हवामान व तसेच आहार यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढत जातात. जे आपल्या शरीराला हानिकारक असतात.

ही प्रक्रिया किती वेळा करावी हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरते. हा उपाय करताना मधुमेह असलेल्यांनी विशेषत तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच करावा. यामध्ये तुम्हाला काही पथ्य देखील पाळावे लागतात ते प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार थोड्याफार प्रमाणात बदलू शकतात. अशक्तपणा जाणवत असल्यास तुमच्या आहाराकडे नक्की लक्ष द्या. पाणी मुबलक प्रमाणात प्या तसेच नियमित योग्य व्यायाम करा.

आहार जीवनशैली आणि मनस्थिती या गोष्टींचं संतुलन राखा. शरीर डीटॉक्स झाल्यामुळे तुम्हाला जाणवतील अनेक फायदे. चला तर मग जाणून घेऊयात आजचा हा उपाय. यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी. एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर टाका. हे पाणी चांगली उकळी येईपर्यंत गरम करा. यानंतर हे पेय गाळणीने गाळून घ्या.

हे वाचा:   अंजीर खाण्याआधी ते बनले कसे जातात ते तर बघा.! अंजीर कसे बनते हे नक्की वाचा.!

यामध्ये एक चमचा अँपल cider व्हिनेगर घाला. नंतर एक चमचा मध. व चमच्याने नीट एकजीव करा. हे पेय पिण्याजोगे कोमट झाल्यावर प्या. असे हे पेय तुम्ही नियमित घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील आतडे होतील एकदम साफ!! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *