वर्षानुवर्षे छातीत साठलेला कफ, खोकला झटपट काढा बाहेर.! दम्याचा आजार होईल गायब.! फक्त दोन वेळा करा हा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो आजकाल तर पावसाळाच काय पण इतर कोणताही ऋतू सुरु झाला की तसे अनेक विकार आता डोके काढतात.. सर्दी, खोकला, अतिसार आणि कठीण असा दमविणारा, दम काढणारा दमा…! आयुर्वेदीय द्रुष्टीने आपण आज या आजाराविषयी सोप्या भाषेत जाणुन घेवुन या.. त्यावर काही उपाय आणि काळजी कशी घ्यायची त्याबद्दल देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..

आयुर्वेदीय द्रुष्टया दमा म्हणजे फुफ्फुसात आलेली ओल होय. ही ओल विक्रुत कफामुळे येते,तसेच त्याच वेळी वर्षा ऋतुत निसर्गात वाताचा प्रकोप होतो तसाच शरीरात पण होतो. त्यामुळे फुफ्फुसातल्या बारिक वाहिन्या ह्या आवळल्या जातात. परिणामी, रोग्याला श्वास आत घ्यायला खुप कष्ट पडतात. आता फुफ्फुसात जरी हा कफ दिसत असला तरी आयुर्वेदानुसार ह्या कफाची निर्मिती आमाशयात जठरात होत असते.

हा कफ चुकीच्या आहार विहारामुळे प्रमाणापेक्षा जास्त वाढतो आणि फुफ्फुसात जावुन साचतो.
म्हणजे दम्यात वात आणि कफ दोनही दोषाची चिकित्सा करावी लागते. पण प्रारंभी काही घरगुती उपाय केले असता तुम्हाला पुष्कळ फरक पडू शकतो. कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे.

हे वाचा:   रोजचे वरण खाऊन-खाऊन कंटाळा आला असेल तर करा हे हटके स्टाईल ने वरण.! तीन दिवस तोंडावर चव रेंगाळत राहील.!

यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही. लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते. सर्दी, कफ, खोकला वातावरणातील बदलामुळे अनेकांना या ऋतूत हे त्रास हमखास होतात. यासाठी सर्दी खोकला यांची लक्षणे जसे घसा खवखवणे शिंका येणे इ.

दिसू लागताच उपचार सुरू करावेत.
गरम पाण्यात मीठ व हळद घालून गुळण्या कराव्या. सुंठ, गवती चहा, आले, लवंग, दालचिनी, पिंपळी ,मिरे यांचा काढा करून प्यावा. रात्री झोपताना वाफ घ्यावी. ओली हळद मधात उगाळून तसेच सितोपलादी चूर्णाचे मधासह चाटण घ्यावे. लहान मुलांना बर्याचदा खूप कफ होतो व ढास लागते अशावेळी छातीला तेलात थोडे सैंधव घालून गरम करून मसाज करावा आणि नंतर लसूण व ओव्याच्या पुरचुंडी ने शेकवावे.

अशा सततच्या होणाऱ्या रोगांमुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होऊ लागते. ती रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पेय सात दिवसासाठी बनवायच कस ते सांगत आहोत. या साठी आपल्याला लागणार आहे स्वच्छ धुतलेली 25 ग्रॅम तमालपत्र बारीक चिरलेली. आले सालं काढून बारीक तुकडे करून 50 ग्रॅम घ्यावी. 150 ml पाणी गरम करायला ठेवा. यामध्ये आल्याचे काप घाला. यानंतर तमालपत्र घाला.

हे वाचा:   चालू न शकणारा याच्या सेवनाने पळू लागेल.! दिवसातून एकदा घ्या.! कंबर दुखी, सांधे दुखी, गुडघेदुखी सर्व दुखणे गायब.!

थोडे उकळल्यानंतर यामध्ये आठ ते दहा लवंग घाला. पंधरा मिनिटे हे पेय उकळल्यानंतर सर्व पोषक तत्वे यामध्ये उतरतात. आता हे पेय गाळणी च्या मदतीने गाळून घ्या. हे थोडेसे थंड होऊ द्या यानंतर यामध्ये दोन चमचे मध घाला. थंड झाल्यावर काचेच्या बाटलीमध्ये हे पेय भरून ठेवा. आठवड्यातून तीन दिवस रात्री झोपताना तसेच सकाळी रिकाम्या पोटी या पेयाचा प्रयोग तुम्ही नक्की करा.

तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कधीच होणार नाही सर्दी कफ खोकला दमा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *