घरात खूप पालीने थैमान घातले आहे का.? तर मग चार कोपऱ्यात या चार गोळ्या ठेवा एकही पाल बघायला शिल्लक राहणार नाही.!

आरोग्य

अनेकदा घरामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला पाल दिसून येते. कधीकधी भिंतींवर लटकलेली पाल आपल्याला बघायला खुप नको नकोसे वाटते. घरातील पाल पळवण्यासाठी चा आज आपण एक अत्यंत महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील पाल लवकरच बाहेर निघून जाईल. आजचा उपायामुळे पालीला कायमचे घरातून हकलावता येते.

चला तर मग जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला इथे काय काय सामग्री लागणार आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी कॉफी पावडर घ्यायची आहे. दुसरी गोष्ट इथे घ्यायचे आहे ते म्हणजे तं’बाखू. जर तुमच्या घरा मध्ये कोणी तं’बाखू खात नसेल तर पानपट्टीवर आपल्याला तं’बाखू शुल्लक किमतीमध्ये उपलब्ध होते. केवळ पाच रुपयांमध्ये तं’बाखूचे पॅकेट तुम्हाला मिळून जाईल.

आपल्याला इथे एका वाटीमध्ये तं’बाखूच्या पाकीटामधील सर्व तं’बाखू घ्यायची आहे. जर तुमच्या आजूबाजूला तं’बाखू मिळत नसेल तर यानंतर दूसरा देखील उपाय आपण पाहणार आहोत. पण सर्वप्रथम आपल्याला इथे पात्रांमध्ये ही किंवा छोट्या वाटीमध्ये ही संपूर्ण तं’बाखू घ्यायची आहे. यामध्ये कॉफी पावडर टाकायची आहे. यामुळे चांगला सुगंध येईल.

मापामध्ये कमी-जास्त झाल्यास काळजी करू नये पण तं’बाखू आणि कॉफी पावडरचे मिश्रण आपल्याला इथे वापरायचे आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन थेंब पाणी टाकायचे आहे. आता या तिन्ही गोष्टींना मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहे. असे छोटे छोटे गोळे बनवून झाल्यानंतर त्यांना चार ते पाच तास सुकायला ठेवायचे आहे. हे गोळे सुकवण्यासाठी आपल्याला उन्हाचा वापर करायचा नाहीये.

हे वाचा:   कितीही घाण भांडे असू द्या.! दहा मिनिटात चमकू लागेल भांडे.! ही ट्रिक फार कमी लोकांना माहिती आहे.!

जर तुम्ही हे गोळे रात्री बनवून ठेवले सकाळपर्यंत ते सूकून जातील. सुकून झाल्यानंतर हे गोळे जिथे जिथे पाल येते तिथे तिथे त्या त्या जागेवर तुम्ही हे गोळे ठेवू शकता. जर तुमच्या घरी लहान मुले असतील तर तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. लहान मुले हे गोळे खाऊ देखील असतात म्हणून आपल्याला काळजीपूर्वक हे ठेवायचे आहेत. जर तुमच्याजवळ तं’बाखू उपलब्ध नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला तं’बाखू मिळत नसेल.

तर तुम्ही इथे कांदा आणि लसुन चा वापर करू शकता. कांदा व लसुन आपल्या सर्वांच्या घरात सहज उपलब्ध होते. त्यानंतर आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. या लसणाचा वापर करताना आपल्याला हा लसूण सोलून घ्यायचा आहे. आता कापून घेतलेला कांदा आणि या लसणाच्या पाकळ्या आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

हे वाचा:   नसांमध्ये कमजोरी, सूज, नसा ब्लॉक होणे, सर्व समस्या असतील तर चिंता करू नका.! हे एक काम करा, आठ दिवसात सगळं काही आपोआप ठीक होईल.! जाणून घ्या कसे.!!!

त्यानंतर या बनुन झालेल्या पेस्ट ला गाळून घ्यायचे आहे. आता त्यातून निघालेले पाणी आपल्याला स्प्रे बॉटल मध्ये घेवून जिथे-जिथे जिथे पाली येत असेल किंवा जिथे जिथे पाल दिसेल तिथे तुम्हाला हे पाणी टाकायचे आहे. यामुळे परत कधीच पाल घरात येणार नाही. त्याच बरोबर जर तुम्हाला तं’बाखू मिळत नसेल तर तुम्ही तं’बाखूच्या जागेवर शिंकणी चा वापर देखील करू शकता.

लेखात सांगितलेले सर्व उपाय तुम्ही घरामध्ये सहजपणे तयार करू शकता यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. त्याचबरोबर डास, कीटक आणि पाल अशा कोणत्याही गोष्टी तुमच्या घरात पुन्हा दिसणार नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *