पावसात भिजल्याने केस गळती होऊ शकते का.? अत्यंत महत्त्वाची माहिती, पावसात जाण्यापूर्वी डोक्याला कोणते तेल लावून जावे.?

आरोग्य

सध्या पावसाळा सुरू आहे पावसाची रिमझिम सुरूच असते अशावेळी आपल्याला बाहेर अनेक प्रकारचे कामे असतात. अशावेळी आपण कधीकधी बिना छत्रीचे पण बाहेर पडत असतो यामुळे आपण पूर्णपणे भिजले जात असतो. तसेच आपले केस देखील यामुळे ओले होत असतात. अनेकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल की पावसाचे पाणी जर डोक्यावर पडले तरी यामुळे केस गळती होऊ शकते का.?

मान्सूनचे आगमन होताच केस गळण्याची सर्वात मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. आज आम्ही तुमच्या या समस्येवर उपाय आणला आहे. पावसाळ्यात केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. या ऋतूमध्ये टाळूमध्ये आर्द्रता वाढल्याने फॉलिकल्स बंद होतात. त्यामुळे केस तुटणे, गळणे, खाज येणे आणि इन्फेक्शनची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत तुम्ही या तीन केसांच्या तेलांचा वापर करून या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

हे वाचा:   डोळ्या साठी हे अमृत आहे.! जे लोक डोळ्यावरचा चष्मा काढू इच्छिता त्यांच्या साठी खास उपाय.! नक्की वाचा.!

चला तर मग जाणून घेऊया ही कोणती तीन तेल आहेत ज्याचा वापर करून तुम्ही पावसाळ्यात केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. नारळाचे तेल पावसाळ्यात उत्तम आहे. केस गळणे थांबवण्यासाठी खोबरेल तेल पावसाळ्यात सर्वोत्तम मानले जाते. वास्तविक, खोबरेल तेलामध्ये फॅटी अॅसिड आणि प्रोटीन्स असतात, ज्यामुळे केसांना मजबूती मिळते.

टी ट्री ऑइल हा देखील पावसाळ्यात चांगला पर्याय आहे. चहाच्या झाडाचे तेल पावसाळ्यात देखील चांगले परिणाम देते. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म केस गळणे थांबवतात. एवढेच नाही तर हे तेल केसांना कोरडे होण्यापासून वाचवते. हे तेल केसांना लावण्यापूर्वी लक्षात ठेवा की ते कोणत्याही कॅरियर ऑइलमध्ये मिसळल्यानंतर ते केसांना लावा.

बदामाचे तेलही पावसाळ्यात चांगले असते बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आढळते, ज्यांना कोरड्या केसांचा त्रास आहे ते पावसाळ्यात हे तेल वापरू शकतात. बदामाचे तेल देखील पावसाळ्यात लावण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळे तेल वापरून तुमच्या केसांची निगा राखू शकता. केस गळती होण्याचे अनेक कारणे असतात परंतु आपल्या डोक्यात येत असते की पावसामुळे केस गळती होत असावी.

हे वाचा:   केसगळती होण्याचे नेमके कारण जाणून घ्या.! ह्या कारणामुळे दररोज गळतात केस.! स्त्रियांनी नक्की वाचा.!

पावसाच्या पाण्यामुळे केस गळती होत नाही. परंतु पावसामध्ये भिजल्या नंतर आपल्याला काही आजार होऊ शकतात जसे की सर्दी ताप पडसे. त्यामुळे पाऊस जर पडत असेल तर थांबावे किंवा छत्री रेनकोट इत्यादीचा वापर करावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.