आपले डोळे ही निसर्गाने दिलेली एक मोलाची देणगी आहे. अविभाज्य असा अवयव आहे. आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुमचे डोळे व्यवस्थित असतील तर तुम्हाला समोरचे स्पष्ट दिसते,अन्यथा आपल्या डोळ्यांसमोर अंधारी धुरकट पणा दिसू लागतो. ही समस्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. हल्ली अनेक जण तासन्तास, लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्व तंत्रांचा यंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
लहान मुले देखील जास्तीत जास्त वेळेस मोबाईलवर गेम खेळत असतात. व्हिडिओ पाहत असतात. या सर्वांचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होत असतो. बहुतेक वेळा डोळ्यांमधील ज्यावनसा असतात त्या नसांवर ताण निर्माण होतो परिणामी नसांमधील र’क्त’प्रवाह सुरळीत होत नाही, अशा वेळी नजर हळूहळू कमजोर होऊ लागते आणि आपल्याला चष्म्याचा नंबर लागतो.
डोळ्याची नजर मजबूत होण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात परंतु फारसा काही फरक पडत नाही. आहारामध्ये अनेक पदार्थांचा समावेश करत असतात तरीदेखील काही उपयोग होत नाही म्हणूनच तुमच्या सगळ्या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्याला एक उपाय जाणून घ्यायचा आहे.हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवला येईल तसेच हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा सांगण्यात आलेला आहे.
आजचा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपल्या आजूबाजूला सहज रित्या उपलब्ध होतात. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला खजूर चा वापर करायचा आहे.खजूर हा आपल्या आहारात लेख अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. जर आपण खजूर दुधासोबत सेवन केले तर आपल्याला खजुराचे अनेक औषधी गुणधर्म दुप्पट स्वरूपात प्राप्त होतात.
खजूर सेवन केल्याने आपले डोळ्यांचे आरोग्य सुधारते पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील हाडांचे आरोग्य देखील चांगले राहते. खजूर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण तीन ते चार पद्धतीने खजूर खाण्याचे प्रकार जाणून घेणार आहोत. तुम्हाला हवे असल्यास खजूर तुम्ही रात्रभर दुधामध्ये भिजवून सकाळी देखील सेवन करू शकता जेणेकरून खजूर नरम होतील त्याचबरोबर खजूर दुधा मध्ये गरम करून हे मिश्रण उकळून देखील सेवन करू शकता.
त्याचबरोबर खजूर पावडर बनवून आपण दुधामध्ये एक चमचा मिक्स करून देऊ शकतो. तसे पाहायला गेले तर खजूर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता गुणधर्म असतात आणि म्हणूनच अनेकदा थंडी म्हणजेच हिवाळ्याच्या दिवसात खजूर प्रामुख्याने खाल्ले जातात परंतु हा हल्ली पावसाळ्याचे दिवस आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या महत्त्वाच्या समस्या त्रास देतात म्हणून आपल्या शरीरातील हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी व पावसात भिजल्यामुळे देखील अनेकांना सर्दी खोकला यासारखे आजार होतात.
अशा वेळी शरीरामधील उष्णता यांचे प्रमाण संतुलित राहणे गरजेचे ठरतात. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला खजूर काही प्रमाणामध्ये बारीक खलबत्त्या च्या सहाय्याने कुठून घ्यायचा आहे जेणेकरून खजूर मध्ये ज्या काही बिया असतील त्या बाहेर निघून जातील. खजूर बियांचा देखील वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो जर तुमच्या डोळ्यांवरील वरील भागाला जर फोडी आली असतील तर अशावेळी या बिया त्या भागावर लावल्यास किंवा हळुवार चवल्यास थोडी पुर्णपणे बरी होऊन जाते.
खजूर मध्ये लोह, आयरनचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच अशा वेळी जर तुमच्या शरीरात र’क्ताची कमतरता निर्माण झाली असेल ती कमतरता भरून काढण्याचे कार्य खजुर करतो. आता आपल्याला एक ग्लासभरकोमट दूध घ्यायचे आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, कोमट दुधामध्ये खूप सार्या औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते अशावेळी आपल्या डोळ्यांची नजर तेच बनते पण त्याचबरोबर शरीरातील हाडांचे आरोग्य सुधारते म्हणून आपल्याला एक ग्लासभर कोमट दुधामध्ये बारीक वाटून घेतलेले खजूर मिक्स करायचे आहे.
जेणेकरून कोमट दुधामुळे खजूर नरम होतील व खायला आपल्याला जास्त अडचण देखील येणार नाही त्याच बरोबर खजूर मध्ये पोटॅशियमची मात्रा जास्त असते. जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर तुमचा ब्लडप्रेशर देखील नियंत्रणात येईल. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लास भर दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये बारीक वाटलेले खजूर मिक्स करायचे आहे. हे मिश्रण आपल्याला चांगले उकळू द्यायचे आहे.
तुम्ही चवीसाठी साखर देखील मिक्स करू शकता किंवा गूळ मिक्स करू शकता परंतु जर तुम्हाला डायबिटीज असेल तर हे दोन्ही पदार्थ शक्यतो टाळा. हे मिश्रण व्यवस्थित ऐकून झाल्यानंतर आपल्याला सेवन करायचा आहे,असे केल्याने आपल्याला लवकरच फरक जाणवेल त्याचबरोबर तुमच्या शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत होईल डोळ्यांची नजर तेज होईल.
बहुतेक वेळा एकाच ठिकाणी जास्तीत जास्त बसून अनेकदा शरीराची हालचाल होत नाही व शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही त्याचबरोबर हल्ली आपण सातत्याने कॉम्प्युटर, मोबाईल वापरत असतो यामुळे डोळ्यांच्या नसांची हालचाल देखील होत नाही. र’क्तप्रवाह व्यवस्थित प्रवाहित होत नाही अशा वेळी देखील डोळ्यांवर ताण निर्माण होतो आणि परिणामी डोळ्यांची नजर कमी होते.
आजच्या लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही सातत्याने एक महिना केला तर तुमची नजर तर वाढणार आहे पण त्याचबरोबर शरीरामध्ये हाडे संबधीत संबंधित काही आजार निर्माण झाले असतील तर ते देखील पूर्णपणे दूर होऊन जातील म्हणून आजचा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.