हळूहळू केस गळू लागले की कुठलीही व्यक्ती पूर्णपणे त्रस्त होऊन जात असतो. कारण यामुळे डोक्यावर टक्कल पडू लागते अशावेळी अनेकांना वाटत असते की आपले केस हे गळले नाही पाहिजे. डोक्यावर भरपूर असे केस असायला हवे. परंतु यासाठीही तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला या संदर्भातील खूपच महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
केस परत आणण्यासाठी आणि टक्कल दूर करण्यासाठी तुम्ही मुलेठी ची मदत घेऊ शकता. यासाठी, तुम्ही थोडी मलेठी घ्या आणि त्यात चिमूटभर केशर सुद्धा घाला. याला बारीक करून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर लावा आणि सकाळी शाम्पू करा.
यासाठी तुम्ही केळी आणि लिंबाचा एक छोटासा उपाय करू शकता. यासाठी एक केळे घ्यावे, ते चांगले मॅश करावे, नंतर त्यात लिंबाचा रसाचे काही थेंब घालावे. यानंतर, हे पेस्ट हेअर कलर ब्रशच्या मदतीने डोक्यावर लावावी, काही तास याला तसेच सोडावे, नंतर शॅम्पू करावा. यामुळे केस गळणे देखील कमी होते आणि केस पुन्हा वाढू लागतात.
यासाठी तुम्ही कांद्याचा देखील एक उपाय करू शकता कांदा सोलून मधून दोन भाग करावे. यानंतर, जिथे केस जास्त गळत आहेत त्या ठिकाणी रोज पाच-सात मिनिटे कांदा डोक्यावर हलक्या हाताने चोळावा. यामुळे, केस गळणे देखील थांबेल आणि नवीन केस देखील येऊ लागतील.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.