कोणत्याही कार्यक्रमात जाताना हा उपाय करून जा.! सगळ्यात जास्त त्वचा तुमची चमकेल.! गोरे होण्यासाठी जास्त खर्च नको… एक कांदा तुमचे काम करून टाकेल.!

आरोग्य

प्रत्येक महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या त्यांना आपला चेहरा सुंदर दिसावा असे वाटत असते. सुंदर चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. चेहरा तितका सुंदर आणि स्वच्छ असेल तितके आपले व्यक्तिमत्व देखिल सुंदर दिसते. चारचौघांमध्ये आपली प्रतिमा उच्च असते म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट करत असतात.

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल आलेले असतात आणि अशा वेळी चेहरा विद्रूप दिसतो. हा विद्रूप झालेला चेहरा सुंदर बनवण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक क्रीम देखील आपण वापरत असतो परंतु या क्रीमने आपला चेहरा चांगला तर दिसतो परंतु हा परिणाम तात्पुरता असतो. कालांतराने आपल्या चेहरा पूर्वीपेक्षा जास्त खराब दिसू लागतो.

जर तुम्ही सुद्धा खूप सारे उपचार पद्धती करून थकलेले असाल आणि तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर बनवायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नैसर्गिक उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुमचा चेहरा अगदी सुंदर तेजस्वी दिसणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे तेज येईल आणि चारचौघांमध्ये तुमची प्रतिमा देखील उजळणार आहे.

आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये चेहरा नैसर्गिक रित्या चमकवण्यासाठी खूप सारे उपाय सांगण्यात आले आहेत परंतु मनुष्याला इतका वेळ नाही की तो घरच्या घरी काही करू शकेल म्हणून अशा वेळी तो बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रोडक्ट चा वापर करतो. हे सारे प्रोडक्ट वापरल्याने फरक जाणवतो परंतु अनेक समस्या उद्भवतात म्हणूनच जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्ही कामाला जात असाल काही कारणामुळे तुम्हाला स्वतःसाठी जास्त वेळ देता येत नसेल तरी अजिबात चिंता करू नका.

हे वाचा:   जेवणात ओलं खोबर वापरावे की सुके? ओल्या खोबऱ्याचे शरीरावर काय होतात परिणाम.!

काही वेळेतच तुमची त्वचा सुंदर होणार आहे, यासाठी तुम्हाला जास्त वेळ खर्च करण्याची गरज देखिल नाही. आजचा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहे ते अगदी सहजरीत्या उपलब्ध होणारे आहेत म्हणूनच आजचा उपाय आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. हा कांदा आपल्याला लाल रंगाचा घ्यायचा आहे बाजारामध्ये हा कांदा उपलब्ध असतो.

कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते आणि सल्फर आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरतो. जर तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे काळे डाग वांग, सुरकुत्या, पिंपल्स आले असतील तर ती दूर करण्याची शक्ती कांद्यामध्ये असते. आता आपल्याला कांद्याचा रस लागणार आहे, त्यासाठी आपल्याला कांदा बारीक किसून घ्यायचा आहे आणि गाळणी द्वारे त्याचा रस काढायचा आहे.

त्याचबरोबर आपल्याला एका साबणाचा किस देखील लागणार आहे. तुम्ही जो साबण नेहमी वापरतात ज्यामुळे तुम्ही त्वचा तुमचे सुंदर करता अशा कोणत्याही ब्रँडचा साबण आपल्याला किसणी द्वारे बारीक किसून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला एका पातेल्यामध्ये कांद्याचा रस टाकायचा आहे आणि कॉर्न स्टार म्हणजेच मक्याचे पीठ आपल्याला गरजेनुसार टाकायचे आहे.

एक ते दोन चमचा आपण मक्याचे पीठ टाकून मिक्स केले तरी चालेल. आता आपल्याला हे पातेले गॅसवर ठेवायचे आहे आणि नंतर व्यवस्थित पेस्ट तयार होत नाही, तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला गरम करायचे आहे.मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला आपण जो साबणाचा किस केलेला होता तो पातेलामध्ये टाकायचा आहे आणि हे सारे मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर जोपर्यंत क्रीम तयार होत नाही.

हे वाचा:   एकदा उपाय केल्यावर चेहऱ्यावर मरेपर्यंत केस उगणार नाही, छोटासा उपाय देईल मोठा फायदा.!

तोपर्यंत आपल्याला हे सगळे मिश्रण एकजीव करायचे आहे, त्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका डब्यात भरायचे आहे आणि फ्रिजमध्ये एक ते अर्धा तास ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या हातापायाला, काखेमध्ये, मानेला ज्या ज्या ठिकाणी काळे डाग पडलेले आहेत, पिंपल्स आलेले आहेत अशा ठिकाणी देखील तुम्ही ही क्रीम लावू शकता. त्यासाठी आपल्याला प्रभावित जागेवर क्रीम लावायची आहे त्यानंतर हलका मसाज करायचा आहे.

क्रीम ही पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवायचे आहे त्यानंतर प्रभावी जागा स्वच्छ पाण्याने धुवायची आहे परंतु हा उपाय करत असताना आपल्याला डोळ्यांच्या अवतीभवती ही क्रीम वापरायची नाही जेणेकरून डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, अशाप्रकारे आपण हा उपाय केला तर काही दिवसांमध्येच चेहऱ्याच्या आजूबाजूला आलेले काळे डाग, पिंपल्स, अंडर आम्स मधील काळे पणा पूर्णपणे दूर होऊन जाईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *