दररोज घरात जाळा या तीन वस्तू कधीही घरामध्ये पडणार नाही कसली कमतरता; पैशाने घर भरून जाईल.!

अध्यात्म

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अग्निला आहुती देण्याची परंपरा आहे. अग्निदेवाचे प्रतिक असलेल्या यज्ञाहुतीचे महत्व तर आपणा सर्वांनाच माहित असेलच. यज्ञाच्या वेळी ‘धुपम्ं दीपम्ं समर्पयामि’ या मंत्राचा वापर याचकरता केला जातो. म्हणजेच अग्निमध्ये आहुती व समर्पनाचे महत्व पुर्वापार चालत आले आहे.याचमुळे हिंदु धर्मामध्ये अग्निचे माहात्म्य जपले जाते.कोणत्याही वाईट गोष्टींना व नकारात्मक गोष्टींचे प्रतिनिधित्व करणार्‍या गोष्टींना स्वाहा केले जाते ते याचमुळे.

हिंदु धर्माच्या परंपरानुसार अग्नि मध्ये समर्पन होणे म्हणजे संपूर्णत: मुक्ती मिळणे असे मानले जाते. याचे महत्त्व लक्षात घेवूनच अगदी पुरातन काळापासून देवाची आरती अग्नि पेटवून व धूप जाळुन पूर्ण होते. दिप, धूप आणि कापूराचे ज्वलन केल्याने व्यक्तिच्या जीवनातील अंधकार दूर होवुन प्रकाशमय जीवन सुरु होते अशी धारणा आहे. दररोज घरामध्ये धूपबत्ती करणे, कापूर लावणे याचे महत्व आहे.

ज्याप्रमाणे घरांमध्ये तिन्हीसांजेला दिवा लावण्याचे महत्त्व आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे, त्याचप्रमाणे घरांमध्ये धूपबत्ती करण्याचे देखील महत्त्व सांगितले आहे. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे घरामध्ये ज्या पाच वस्तू जाळल्याने घरामध्ये शांतता सौख्य समृद्धी व सकारात्मकता लाभते त्या वस्तूंबद्दल माहिती सांगणार आहोत.

हे वाचा:   सोमवारच्या दिवशी करा या वस्तू दान, आर्थिक संकट तसेच आरोग्याचे संकट होईल दूर.!

धूप – आपल्या हिंदु धर्माच्या परंपरेनुसार पारंपारिक पूजेचा भाग म्हणजे धूप लावणे होय. प्रत्येक घरामध्ये पूजेनंतर धूप लावण्याची प्रथा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाळली जाते. घरामध्ये धुपबत्ती लावल्यामुळे वातावरण पवित्र होते तसेच जीव जंतूंचा नाश होतो व मनःशांती देखील लाभते.

गोवरीचा धूर – घरांमध्ये धुप लावणे महत्त्वाचे असतेच पण यासोबतच पिवळ्या मोहरी, गुग्गुळ, लोबन आणि गाईचे तूप लावून शेणाच्या गोवरीवर टाकुन धुर केला तर गोवरीच्या धुराने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा समाप्त होते व घरामध्ये सुख शांती व सकारात्मकता वाढते. शेणाच्या गोवरी वर लिंबाची पाने टाकून ती गोवरी पेटवून संपूर्ण घरांमध्ये तिचा तो धुर पसरवावा. त्यामुळे घरामधील सर्व विषाणू, कीटाणू, जीवाणू यांचा खात्मा होतो व घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते. लिंबाच्या पानांचा दूर केल्यामुळे घरामध्ये आरोग्यसंपत्ती लाभते.

कापूर आरती – संध्याकाळच्या वेळी कापुर आरती करणेदेखील शुभ मानले जाते. जर आपल्या घरामध्ये घराचे बांधकाम करताना पायऱ्या किंवा टॉयलेटची दिशा चुकीची झाली असेल, तर त्या ठिकाणी दररोज कापूराची वडी जाळावी. कापुरवडी जाळल्यामुळे घरांमधील वास्तुदोष नष्ट होतो. रोज घरामध्ये देवपूजा व आरती केल्यानंतर कापूर पेटवावा व कापराचा धूर संपूर्ण घरामधून बाहेरपर्यंत पसरवावा.

हे वाचा:   स्त्रीयांनी फरशी पुसताना ही चुक मुळीच करू नका; यामुळे घरात गरिबी येते.. पैसा टिकत नसेल तर आजपासूनच सावध व्हा.!

जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल व कायमच घरात आर्थिक चणचण भासत असेल, तर अशावेळी महाकालीच्या मंदिरात जाऊन महाकाली समोर धूप लावावा. तसेच दर शुक्रवारी महाकालीच्या मंदिरात जाऊन महाकालीचे दर्शन घ्यावे.

कापराच्या वडीवर लवंग टाकून तो पेटवल्यामुळे घरामध्ये त्यांचा सुगंध पसरतो शिवाय घरामध्ये सुख-शांती लाभते. तसेच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात. घरामध्ये नियमित धुपबत्ती व कापूर -आरती व गोवरी जाळल्यामुळे घरामध्ये सुख सौख्य व आरोग्य लाभते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *