वेदा पुराणांमध्ये अनेक प्रकारचे मंत्र सांगितले गेले आहेत. प्रत्येक मंत्राचे वेगवेगळे महत्त्व सांगितले जाते. अनेक असे मंत्र आहेत ज्याला खूपच श्रेष्ठ मानले जाते. असाच एक मंत्र आहे ज्याला गायत्री मंत्र असे देखील म्हटले जाते. धर्मग्रंथांमध्ये तसेच शास्त्रांमध्ये गायत्री मंत्रा बद्दल अनेक माहिती सांगितली गेली आहे. या मंत्राचा निरंतर जप केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे सर्व संकटे नाहीसे होत असतात. अनेक ऋषीमुनी या मंत्राचा अनेक काळापासून जप करत आले आहेत.
हिंदू धर्मामध्ये या मंत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. असे सांगितले जाते की हिंदु धर्मातील प्रत्येक व्यक्तीने या मंत्राचा जप करायला हवा. परिवारातील प्रत्येक व्यक्तीने हा मंत्र न चुकता म्हणायला हवा. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होत असतात असे करणे का शुभ मानले जाते या सर्वांबद्दल सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत. तर याबद्दल माहिती पाहण्या अगोदर आपण हा गायत्री मंत्र कोणता आहे ते जाणून घेऊया.
ऊँ भूर भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
हा गायत्री मंत्र प्रत्येकाने म्हणायला हवा. गायत्री मंत्रा मध्ये तिन्ही देवांचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे वर्णन केले गेले आहे. त्यामुळे या मंत्राचा निरंतर जाप करायला हवा. यामुळे आपल्याला खूप लाभ मिळत असतो. निरंतर जप केल्यामुळे आपल्याला शक्ती प्राप्त होत असते. यामुळे आपल्या आसपास असलेली सर्व नकारात्मक शक्ती नाहीशी होत असते व आपल्याला निर्माण होत असलेल्या सर्व समस्या नष्ट होत असतात.
ऋषिमुनींनी गायत्री मंत्रा बद्दल असे सांगितले आहे की हा मंत्र असा आहे की यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. यासाठी आपण दररोज नियमित स्वरूपात या मंत्राचा जप करायला हवा. अनेकांना हे माहिती नसते की या मंत्राचा जप कधी करायला हवा तर सूर्योदयाच्या अगोदर या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. यावेळी आपले मन एकाग्र होत असते. तसेच शांत होत असते. त्यामुळे सूर्योदयाच्या आधीच गायत्री मंत्राचा जप करणे आवश्यक आहे.
दररोज या मंत्राचा जाप केल्यामुळे आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. तसेच संपूर्ण परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहते. यामुळे मन शांत होत असते तसेच एकाग्रता वाढत असते. गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे चेहऱ्यावर एका वेगळ्याच प्रकारचे तेज निर्माण होत असते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.