धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला खूपच पवित्र मानले जाते. हिंदू धर्मातील प्रत्येक घरासमोर तुळशी चे झाड असतेच. तुळशीला माता मानले जाते. दररोज प्रत्येक स्री तसेच पुरुष तुळशीची पूजा करत असतात. दररोज सकाळच्या वेळी तुळशी चे दर्शन घेतले जाते व सायंकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावला जातो. तुळशीचे रोपटे जवळपास प्रत्येक घरासमोर असतेच.
तुळशीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या ठिकाणी भगवान विष्णूची पूजा होत असते त्या ठिकाणी तुळशीला खूप महत्त्व दिले जाते. त्या ठिकाणी तुळशीची देखील पूजा केली जाते. तुळशीचे महत्त्व केवळ धार्मिक कार्यामध्येच नाहीतर आयुर्वेदामध्ये देखील तुळशीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक आयुर्वेदिक उपचार पद्धती मध्ये तुळशीचे उपयोग सांगितले गेले आहे.
तुळशीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचे वनस्पती मानले जाते. यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून सुटका मिळत असते. अनेक आजारांवर औषध म्हणून तुळशीचा वापर केला जातो. परंतु धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या घरासमोर जर तुळस असेल तर आपण अशा काही चुका करत असतो ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होत असते.
जर आपल्याही घरासमोर तुळस असेल तर आपण ही चूक नक्की करत असाल. अशा वेळी आपण काय करायला हवे याबद्दल आपण जाणून घेऊया. जर आपल्या घरासमोर एखादी तुळस असेल तर आपण कधीही कोणत्याही कामासाठी तुळशीचे पाने तोडत असतो. परंतु धार्मिकते नुसार असे करणे चुकीचे मानले जाते. यामुळे खूपच अशुभ परिणाम निर्माण होत असतो.
कधीही तुळशीचे पान तोडण्या अगोदर तुळशी मातेचे दर्शन घ्यायला हवे. तसेच अनावश्यक तुळशीचे पाने तोडू नये. आपल्याला हवे तेवढेच पाने तोडावीत. तुळशीचे पाने तोडण्या पूर्वी तुळशीचे दर्शन घ्यावे. दररोज तुळशीसमोर दिवा लावावा. घरातील लहान मुलांना दररोज तुळशीचे पाया पडायला लावावे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.