सध्या आपण पाहतच आहोत की आरोग्य संबंधीच्या अनेक समस्या अनेकांना सतावत आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आरोग्य संबंधीच्या समस्या उद्भवू नयेत तसेच रोगांशी लढण्याची ताकद म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढवावी यासाठी वेगवेगळे काढे घरच्या घरी बनवून घरीच रोगप्रतिकारक शक्तीला वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक जण आपल्या आहारामध्ये पौष्टिक अशा अन्नपदार्थांचा समावेश करु लागला आहे.
सध्याच्या या काळामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळे पदार्थ खात असतात. यामध्ये भरपूर ताकद देणारे पदार्थ देखील आहेत. अनेक पालेभाज्या देखील आहेत. तसेच अनेक फळे देखील आहेत. आरोग्याच्या समस्या उद्भवल्या नंतर शरीरासाठी ताकद मिळावी यासाठी फळांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. सध्याच्या काळामध्ये देखील फळे जास्त प्रमाणात खाल्ली जात आहेत.
परंतु एक असे फळ आहे ज्याचे सेवन तुम्ही केले नाही पाहिजे तसेच ज्या व्यक्तीला संक्रमण झाले आहे अशा व्यक्तींना देखील या फळाचे सेवन करू नये. हे फळ खाल्ल्यामुळे कफ, सर्दी, खोकला आणखी वाढू लागत असतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये हे फळ तुम्ही खाल्ले नाही पाहिजे. सध्याचा काळ असा बनला आहे की प्रत्येकाला वाटू लागले आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होऊ नये.
यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लोक काढा याचे भरपूर प्रमाणात सेवन करू लागले आहेत. जर तुम्हाला काही झाले नसेल तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर विनाकारण काढा पित बसू नये. कारण आपण बघत असतो की दिवसभरातून आपण दोनदा तीनदा काढा सेवन करत असतो. यामुळे मूळव्याधाचा त्रास देखील जास्त होऊ लागतो. तसेच शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण देखील भरपूर वाढू लागते.
त्यामुळे शक्यतो काढा याचे प्रमाण कमी ठेवावे. जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती ची आवश्यकता नसेल तर जास्त प्रमाणात काढा पिऊ नये. परंतु ज्या लोकांना रोगप्रतिकारक शक्ती मध्ये कमतरता भासत असेल शरीरामध्ये काही आजार उद्भवत असेल अशा लोकांनी काढा घेण्यास काही हरकत नाही. सध्याच्या या कालखंडामध्ये आणखी एक महत्त्वाचा सल्ला देण्याची गरज आहे ती म्हणजे कोणतेही दुखणे अंगावरती काढू नये वेळीच दवाखान्यात जावे.
सध्याच्या काळामध्ये तुम्ही भरपूर द्राक्ष चे सेवन करत असाल परंतु द्राक्ष हे फळ खोकल्यासाठी कफ साठी अत्यंत वाईट आहे. कारण यामुळे कफ खोकला खूपच वाढत जात असतो. त्यामुळे या फळाचे सेवन शक्यतो या काळात नाही करणे बरे ठरेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.