वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजाच असतो तुमच्या नशिबाचा दरवाजा, या चुका केल्या तर गरीबी कधीही जात नाही…!

अध्यात्म

घराचे मुख्य प्रवेशद्वार हे खूप महत्त्वाचे असते. याला खूप महत्व दिले जाते कारण मुख्य प्रवेशद्वाराद्वारे आपण ये-जा करत असतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून नेहमी उर्जा आत मध्ये व बाहेर जात असते. त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार हे खूपच सावधानी ने बनवणे आवश्यक असते. जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बद्दल योग्य ती काळजी घेतली तर घरामध्ये समृद्ध प्राप्त होत असते.

वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्त्व दिले गेले आहे. जर घराचे प्रवेशद्वार जर उत्तर आणि पूर्व दिशेमध्ये असेल तर हे खूपच चांगले असते. घराच्या अन्य द्वाराच्या तुलनेत घराचे मुख्य प्रवेशद्वार हे मोठे व मजबूत असायला हवे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर आपण काही चूक या करत असू तर यामुळे घरात अशांतता, दारिद्र्य, पैशाची कमतरता निर्माण होत असते.

हे वाचा:   ४ जुलै रोजी बदलणार आहे या राशीचे नशीब, कधी विचार पण केला नव्हता एव्हढा लाभ होणार आहे, जाणून घ्या कसे असेल तुमचे राशिभविष्य.!

लक्षात ठेवा की घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कधीही कचऱ्याची कुंडी ठेवू नये किंवा त्या ठिकाणी कचरा टाकू नये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही आरसा ठेवू नये. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाडे असेल तर अतिउत्तम आहे तुम्ही त्या ठिकाणी झाडांच्या कुंड्या देखील देऊ शकता.

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर आपण झाडे किंवा कुंड्या ठेवला तर हे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर असते. घराचा मुख्य दरवाजा हा 90 अंश या मध्ये पूर्णपणे उघडला पाहिजे उघडताना कसल्याही प्रकारचा आवाज न करता दरवाजा उघडायला हवा. घराच्या मुख्य दरवाजाला कधीही काळा रंग देऊ नये असे अत्यंत अशुभ मानले जाते.

हे वाचा:   श्रावण महिन्यात जे लोक ठेवत असतात अशी दिनचर्या त्याला भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो, आयुष्यातून सर्व समस्या होतील कायमच्या दूर.!

घराच्या मुख्य दरवाजाच्या आसपास कुठेही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नये यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत असते. घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती काही धार्मिक चिन्हे लावावी जसे की स्वस्तिक ओम असे केल्याने घरात नेहमी सकारात्मकता येत राहात असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *