पांढरे केस होणे ही समस्या सध्या बऱ्याच जणांना निर्माण होत आहे. अगदी कमी वयातही पांढरे केस होण्याची ही समस्या दिसून येत आहे. अगोदर वयाच्या साठी किंवा सत्तरी नंतर केस पांढरे होत असे परंतु हळूहळू हे प्रमाण कमी होत आले आता अगदी लहान मुलांना देखील केस पांढरे होण्याची समस्या दिसून येत आहे. याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे चुकीचे खानपान व चुकीची जीवनशैली.
अनेक लोक केस पांढरे झाल्यानंतर वेगवेगळे उपाय करून बघत असतात. यासाठी बाजारांमध्ये वेगवेगळे केमिकलयुक्त पदार्थ देखील मिळत असतात जे दावा करतात की तुमचे केस पूर्णपणे काळे होतील. परंतु हे पदार्थ केसांना लावल्यास काही दिवसांकरिता केस काळे होतात परंतु पुन्हा आहे तसे होऊन जातात. याचे केसांवर भरपूर असे साईड इफेक्ट देखील होत असतात. कारण यामध्ये अनेक हानिकारक केमिकल मिश्रित केलेले असतात.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा असा घरगुती नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यावर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नक्कीच फायदा झालेला दिसेल. पांढरे झालेले केस काळे झालेले दिसतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर हा पदार्थ लागेल. कापूर आपण पूजेसाठी घेत असतो. देवघरामध्ये पूजा करण्यासाठी चा उपयोग केला जात असतो. या उपायासाठी आपल्याला कपूरची आवश्यकता भासेल. चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय व कशा प्रकारे करावा.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खोबऱ्याचे तेल लागेल खोबऱ्याचा तेलाच्या वापराने तुम्ही केसांना काळे करू शकता फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय करावा लागेल. आणखी एक पदार्थ आपल्याला लागेल तो म्हणजे आवळा चूर्ण आवळा चूर्ण आपल्या आरोग्यासाठी देखील खूपच उपयुक्त मानला जातो.
सर्वप्रथम गॅस वर एक छोटेसे पातेले ठेवावे व त्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे तेल टाकावे. या पातेल्यामध्ये टाकलेल्या तेला मध्ये आपण हे आवळा चूर्ण अर्धा चमचा टाकायचे आहे. हा उपाय करत असताना गॅस मंद आचेवर ठेवावा त्यानंतर यामध्ये दोन ते तीन कापूर कुस्करून टाकावे. असे केल्यानंतर काही वेळातच त्यामधून थोडासा फेस आल्यासारखे दिसेल त्यावेळी गॅस बंद करून टाकावा.
त्यानंतर हे मिश्रण गाळणीच्या साह्याने एका वाटीमध्ये गाळून घ्यावे. हे तेल रोज रात्री झोपतेवेळी लावावे उपाय केल्याने काही दिवसातच केस काळे झालेले दिसतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.