आपले आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने आपण खूप काळजी घेत असतो. आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारचे प्रक्रुती असतात, वात, पित्त आणि कफ. या तिन्ही पैकी एक जरी प्रकृती बिघडली तर शरीरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे या तिन्हींचा बॅलन्स असणे देखील खूप गरजेचे असते. जर या तिन्हींचा चांगल्याप्रकारे बॅलन्स नसेल तर यामुळे शरीरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात.
त्यामुळे आपल्याला या तिन्हींचा बॅलन्स ठेवणे खूप गरजेचे आहे. या तिनी प्रकृती बॅलन्स राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे हे आपण पाहणार आहोत. असे काही पदार्थ जे यापैकी तसेच या व्यतिरिक्त कोणतीही शारीरिक प्रकृती झाल्यानंतर खाऊ नये याबाबत आपण सविस्तर पणे माहिती पाहूया.
ज्यांना हाडे दुखीचा त्रास आहे, तसेच सांधीवाताचा त्रास आहे, मांस पेशी मध्ये त्रास होत आहे, अशा लोकांनी लिंबू दही अशा प्रकारच्या या पदार्थांचे सेवन करू नये. कारण हे आंबट गोड पदार्थ असतात यामुळे वायू रोग आणखी वाढला जात असतो. तसेच यांसारखेही आजार आणखी वाढले जात असते. त्यामुळे हे पदार्थ अशा प्रकारच्या समस्या असलेल्या लोकांनी कधीही सेवन करू नये.
संधिवात म्हणजेच, ज्या ठिकाणी जोडलेले पार्ट असतात म्हणजेच गुडघे, मनका, हाताचे कोपर इत्यादी ठिकाणी त्रास होणे म्हणजे संधिवात होय. संधिवात असलेल्या लोकांनी फुल कोबी, खिरे, मटर आणि उडीद डाळ इत्यादी पदार्थांचे सेवन करणे बंद करावे. कारण यामुळे सांधेदुखीचे दुखणे आणखी वाढले जात असते. सांधेदुखीचा त्रास हा आणखी वाढला जातो. त्यामुळे अशा लोकांनी इत्यादी पदार्थांपासून नेहमी दूरच राहावे.
पित्ताचा त्रास झाल्यानंतर आपण गरम वस्तू पासून नेहमी दूर राहायला हवे. नेहमी जेवण केल्यानंतर जवळ पास एका तासानंतर पाण्याचे सेवन करायला हवे. कच्चे अन्न जास्त प्रमाणात खावे. म्हणजेच फळे सलाद इत्यादी. आपल्या आहारामध्ये जवळपास पन्नास टक्के भोजन हे कच्चे पदार्थ असावे. पित्त असलेल्या रोग्यांनी पत्तागोबी, खिरे, टोमॅटो इत्यादी पदार्थांचे सलाद बनवून खावे. तसेच मोड आलेले कडधान्य देखील खावे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.