आपल्या पुराणांमध्ये तसेच काही ग्रंथांमध्ये अशा बऱ्याचशा बाबी सांगितल्या गेले आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूपच उपयोगी पडत असतात. अनेक लोकांना काही अशा सवयी असतात त्यामुळे त्यांचे सुखी आयुष्य उद्ध्वस्त होत असते. या काही सवयी कोणालाही असल्या नाही पाहिजे. अन्यथा यामुळे घरात असलेली सुखाचे दिवस नष्ट होत असतात.
गरुड पुराण हे वैष्णव संप्रदायाशी संबंधित एक महापुराण आहे. सनातन धर्मात मृ’त्यू नंतर मोक्ष देण्याचा मानला जातो. म्हणूनच सनातन हिंदू धर्मात मृ’त्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची प्रथा आहे. या पुराणातील प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, पुण्य, निःस्वार्थ कर्मे यांच्या वैभवाने, अनेक वैश्विक आणि अतींद्रिय फळ सामान्य माणसाला त्याग, दान, तपस्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये प्रवृत्त करतात.
या पुराणात असेही सांगितले गेले आहे की ती कर्मे कोणती आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गरीबी येते. आजच्या या लेखामध्ये आपण या संदर्भातील माहिती पाहणार आहोत. असे काही कामे ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात गरिबी येते सुखाचे दिवस नष्ट होत असतात. अशा काही सवयी, अशी काही कर्म तुम्ही आपल्या आयुष्यात कधीही केले नाही पाहिजेत.
घाणेरडे कपडे घालणारे लोक: गरुड पुराणानुसार जर एखादी व्यक्ती घाणेरडे आणि मळलेले कपडे घालत असेल तर देवी लक्ष्मी त्याच्यावर खूप रागावतात. जेथे स्वच्छता असते तेथे माता लक्ष्मी राहत असते. त्यामुळे आपण आपला पेहराव हा स्वच्छ ठेवावा. आपण जे कपडे घालणार आहोत ते स्वच्छ असू द्यावे.
दुसऱ्यांच्या कामातील दोष काढणारे: गरुड पुराणानुसार, ज्यांना नेहमीच इतरांमध्ये दोष आढळतात ते त्यांच्याबद्दल वाईट बोलतात असे लोक कधी च आयुष्यात सुखी आणि यशस्वी होऊ शकत नाही. माता लक्ष्मीसुद्धा अशा लोकांच्या घरी थांबत नाही. ज्यामुळे त्यांच्या जीवनात गरीबी येत असते. दारिद्र्य घरामध्ये अनंत काळ राहत असते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.