भीतीदायक स्वप्न पडतात का.? झोपताना करा हा उपाय, भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत.!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला जातो. वास्तुशास्त्र ,ज्योतिष शास्त्र व तंत्र मंत्र शास्त्र, स्वप्न शास्त्र, समुद्र शास्त्र या सर्व शास्त्रांचा अभ्यास प्रामुख्याने केला गेलेला आहे. या शास्त्रामध्ये मनुष्याच्या कल्याणासाठी व भविष्यासाठी खूप काही उपाययोजना सांगण्यात आलेल्या आहेत आणि जर आपण या उपायोजना च्या आधारे आपण काही गोष्टींचे पालन केले तर आपले जीवन समृद्ध होऊ शकते तसेच हल्लीच जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रत्येक जण धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो.

खूप सारी थकान आपल्याला जाणवत असते. बहुतेक वेळा शरीर थकले असले असल्याने आपल्याला झोप लगेच लागते परंतु झोप लागल्यावर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात. ही स्वप्ने कधी चांगली असतात किंवा अनेकदा स्वप्न वाईट असतात,अशावेळी आपल्या मनामध्ये खूप वाईट भीती निर्माण होते. स्वप्न शास्त्रांमध्ये सुद्धा स्वप्नांची वेगवेगळे अर्थ सांगण्यात आलेले आहे. आपल्याला कोणते स्वप्न पडते यावरून त्याची परिणामकारकता सांगण्यात आलेली आहे.

आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या माहितीच्या आधारे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे स्वप्न पडत असतील तर ती स्वप्न पडल्या नंतर तुमच्या जीवनामध्ये कोणतेही वाईट कृत्य होणार नाही किंवा वाईट घटना देखील घडणार नाही चला तर मग जाणून घ्याव्या आजच्या उपायाबद्दल..

हे वाचा:   स्टील च्या भांड्याद्वारे देवपूजा करताय का.? बापरे मग सर्व देव होतील तुमच्यावर नाराज; जाणून घ्या असे करणे का असते अशुभ.!

आपल्यापैकी अनेकांना स्वप्न पाहणे आवडत असते. काही जण झोपल्यानंतर वेगळ्या प्रकारची स्वप्न पडतात. काही स्वप्न आपण स्वतःहून पाहत असतात तर काही स्वप्न कळत नकळत आपल्यावर पडतात.या स्वप्नांचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम देखील होत असतो.आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपल्यावर भयानक स्वप्न पडत असतात.

काही स्वप्न अत्यंत वाईट असतात ,काही नकारात्मक दृश्य सादर करणारे स्वप्न असतात, असे काही स्वप्न पाहिल्या नंतर आपल्या मनामध्ये एक भीती कायम निर्माण होत असते आणि आपण घाबरत असतो जर तुमच्या बाबतीत सुद्धा असेच काहीतरी घडत असेल तर अजिबात चिंता करू नका. आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहोत, तो जरी साधा असला तरी तो अत्यंत प्रभावशाली आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कागद लागणार आहे. हा कागद आपल्याला पांढराशुभ्र घ्यायचा आहे आणि काळ्या रंगाची शाही असलेला पेन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या कागदावर यंत्र स्थापन करायचे आहे. हे यंत्र खूपच सोपे आहे आणि त्याची रचना देखील साधी आहे यंत्र पुढीलप्रमाणे आहे.

हे वाचा:   या दिशेला बसून जेवण करणे म्हणजे आयुष्य कमी करणे; तुम्ही हि चूक करत असाल तर एकदा नक्की वाचा.!

हं सं षं फं
षं दं धं जं
नं यं मं दं
चं यं जं दं

हे यंत्र आपल्याला पांढऱ्या कागदावर तयार करायचे आहे आणि ज्या व्यक्तीला रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्ने पडतात, त्या व्यक्तीच्या उशाखाली हे यंत्र ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. जर तुमच्या आजूबाजूला तलाव नसेल तर अशा वेळी कोणताही झाडाच्या खाली एक छोटासा खड्डा करुन आपल्याला यंत्र पूरायचा आहे, असे केल्याने तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती अजिबात जाणवणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.या उपायाची वाच्छता कुणाकडे करू नका, अन्यथा तुम्हाला या उपायांचे फळ प्राप्त होणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.