वाढत्या वयाबरोबरच शरीर वेगवेगळ्या समस्या निर्माण करू लागत असतात. सांधे दुखी गुडघे दुखी कंबर दुखी इत्यादींचा त्रास हा अनेकांना जस जसे वय वाढत जाते तस तसे सहन करावे लागत असते. परंतु आज काल अगदी तरूण वयापासून तिशितले व चाळिशीतले पुरुष व महिला यांना देखील सांधेदुखी गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागला आहे.
आजच्या या देखा द्वारे आम्ही तुम्हाला, सांधेदुखी गुडघेदुखी झाल्यावर नेमके काय करायला हवे याबाबतची माहिती देणार आहोत. यावर एक खूपच सोपा असा रामबाण उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसातच तुमची गुडघेदुखी सांधेदुखी बरी झाली दिसते. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया हे कशामुळे होत असते.
गुडघेदुखीचा त्रास हा मांस पेशी मध्ये रक्ताचा संचार योग्य प्रकारे न झाल्यामुळे होत असतो. अनेकदा गुडघ्यांच्या मांस पेशींमध्ये तनाव येत असतो यामुळेदेखील गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागत असतो. ज्यांना पण अशा प्रकारची समस्या असते त्यांना चालणे, जिना चढणे इत्यादी कामे खूप भयंकर वाटू लागत असतात.
कारण सांधे दुखी व गुडघे दुखी मुळे अतिशय भयंकर असा त्रास होत असतो. याचा वेळेवरच उपचार केला नाही तर सर्जरी करावी लागू शकते. चला तर मग आम्ही यावर एक सोपा घरगुती असा उपाय सांगतो. आपल्याला या उपायासाठी पेरूच्या झाडाची काही पाने लागणार आहेत. पेरूच्या झाडांच्या पानांमध्ये आणि प्रकारचे गुणधर्म असतात. याचा उपयोग अनेक रोगंशी लढण्यासाठी केला जातो.
आपल्याला या उपायासाठी सहा ते सात पाने लागणार आहे. सर्वप्रथम हे पाने चांगल्या प्रकारे धुवून काढावीत त्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यावे. याची पेस्ट बनल्यानंतर ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर तव्यावर याला काही वेळापर्यंत गरम करून घ्यावे. मध्ये मध्ये याला चमचा च्या साह्याने फिरवत राहावे.
त्यानंतर जेव्हा हे गरम असेल तेव्हा लगेच हा लेप आपल्या गुडघ्यावर लावावा. गरम गरम हा लेप गुडघ्याला लावल्यास याचा फायदा होत असतो. त्यानंतर एका कपड्याच्या मदतीने याला बांधून टाकावे. सकाळच्या वेळी हे पुन्हा काढून टाकावे व स्वच्छ धुऊन काढावे. अशाप्रकारे जर तुम्ही काही दिवस केले तर तुमची गुडघेदुखी बंद होईल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.