पाणी पिणे कायमचे बंद केले तर नेमके काय होईल.! शरीरात जे काही होईल ते वाचून पायाखालची जमीन सरकून जाईल.!

आरोग्य

मित्रांनो पाणी एक अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. जमिनीतील मातीपासून ते बर्फांच्या डोंगरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी उपलब्ध आहे. अर्ध जग तर सोडूनच द्या तुमच्या स्वतः मध्ये सुद्धा पाणी असते. कारण आपल्याला माहीतच असेल की माणसाच्या शरीरामध्ये ६०% भाग पाण्याने बनलेला आहे. तसेतर प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते.

मित्रांनो कधी तुम्ही विचार केला आहे का की जर तुम्ही पाणी पिणे बंद केले तर काय होईल ? तुम्ही किती दिवस जगू शकाल ? व पाणी न पिल्याने तुमचे शरीर कश्या प्रकारे रिॲक्ट करेल ? तर आज आपण पाण्याबद्दल जाणून घेऊया. कारण तुम्हाला माहीत आहेच की पाणी आपल्यासाठी खूप आवश्यक आहे परंतु किती आवश्यक आहे याबद्दल जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जेवढ्याही पेशी असतात त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध असते. कोणत्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किती प्रमाणात आहे हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जसकी तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, तुमच्या शरीरामध्ये किती प्रमाणात फॅट आहे, तुमचे वय काय आहे आणि तुम्ही पुरुष आहात की महिला कारण हेच ते सर्व घटक आहेत ज्यावर आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण अवलंबून असते.

परंतु जर एक एवरेज काढला तर ५५% ते ६०% तरी पाणी एका माणसाच्या शरीरामध्ये आढळून येते. लहान मुलांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि जस जस माणसाचं वय वाढू लागत तस तस पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. जेव्हा एखाद्या लहान मुलाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या शरीराचा ७५% शरीराचा भाग हा पाणीच असतो. परंतु हैराण होण्याची गोष्ट तर ही आहे की जस लहान मूल एक वर्षाचा होतो म्हणजेच जेव्हा लहान मुलाचा पहिला वाढदिवस होतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये फक्त ६५% पाण्याचे प्रमाण होते आणि हे अशाच प्रकारे चालू राहते.

हे वाचा:   ज्यांच्या घरात असतो हा पदार्थ तिथे एकही मुंगी जाऊ शकत नाही.! मुंग्यांचा वैताग आला असेल तर त्यांच्यापुढे ही एक वस्तू ठेवा.!

हळूहळू माणसाच्या वाढत्या वयानुसार पाण्याचे प्रमाण देखील कमी होऊ लागते. मित्रांनो जर पाण्याच्या आवश्यकतेचा जर प्रश्न असेल तर आपल्याला माहीतच आहे आपल्या शरीराचा खूप भाग हा पाण्यानेच बनला आहे. कारण आपल्या शरीरामध्ये पाणी लिब्रीकेंट करायचे काम करते. आपल्या शरीराच्या तापमानाला योग्य ठेवायला मदत करते. आपल्या मेंदूला ताजे करायला देखील मदत करते.

पाणी फक्त आपल्या र’क्तामध्येच उपलब्ध नसते तर ते आपल्या मेंदू व हृदयाचा ३/४ भाग पाण्यानेच बनलेला असतो. एवढेच नव्हे तर आपल्या फुफ्फुसांमध्ये तर एकूण ८३% पाणी उपलब्ध असते. हे ऐकून तुम्ही अगदी आश्चर्य चकित व्हाल की आपल्याला जी हाड अगदी सुखी आणि मजबूत दिसतात त्यांमध्ये सुद्धा ३१% पाणी असते. काही लोकांना असाही प्रश्न पडेल की जर आपल्या शरीरामध्ये एवढं पाणी उपलब्ध आहे.

तर आपल्याला पाणी पिण्याची काय गरज ? आपण दररोज दोन ते तीन लिटर पाणी घाम व लघवी द्वारे शरीराबाहेर टाकतो. ही गोष्ट आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे आणि आपण या गोष्टींना थांबवू देखील शकत नाही. अस केल्याने आपल्या शरीरातून जे पाणी जात त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला पाणी पिण्याची आवश्यकता असते जेणेकरून आपले शरीर डीहायड्रेट होऊ नये व आपल्या शरीरातील पाण्याची पातळी प्रमाणात राहण्यास मदत होईल.

आपल्याला डीहायड्रेशन पासून वाचण्यासाठी प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते नाहीतर डीहायड्रेशनमुळे पाणी नीट काम करत नाही, सुस्ती , मुड खराब होणे, चिडचिडेपणा सारखे वाटणे ह्यासारख्या गोष्टी डीहायड्रेशनमुळे होतात. कारण डीहायड्रेट मेंदूला म्हणजेच ज्या मेंदूमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते त्याला नॉर्मल मेंदुपेक्षा जास्त मेहनत करावी लागते.

हे वाचा:   सकाळी उठल्याबरोबर एवढे एक काम करा, दात एखाद्या मोत्या प्रमाणे चमकू लागतील...!

म्हणजेच तुम्ही कमी पाणी पीत आहात आणि तुमच्या शरिराकडून जास्त काम करून घेत आहात तर तुमचे मेंदू व शरीर दोन्ही खूप लवकर थकेल ज्यामुळे मेंदू संकुचित होऊ लागतो. याचा अर्थ असा मुळीच नाही की शरीरातील पाण्याचे प्रमाण संतूलित ठेवण्यासाठी खूप जास्त प्रमाणत पाणी प्यावे. कारण ओव्हर हायड्रेशनमुळे शरीरामध्ये सोडियम इलेक्ट्रोलाइट्स डायोल्यूटेड होऊ लागतात.

कोशिका सुजू लागतात आणि बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की किडनीला पाणी नीट फिल्टर करणे देखील कठीण होऊन जाते. काही काही शास्त्रज्ञांनुसार दररोज ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे परंतु आजकाल काही शास्त्रज्ञांनुसार असे म्हणते जाते की एका व्यक्तीला त्याचा आजूबाजूच्या परिसरानुसार, वयानुसार व वजनानुसार पाणी पिणे गरजेचे असते जेणेकरून शरीरामध्ये पाण्याची कमतरता राहू नये.

काही शास्त्रज्ञांनुसार पुरुषांना निदान दिवसातून २.५ ते ३.५ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे आणि एका महिलेला २ ते २.५ लिटर पाणी पिणे गरजेचे असते. यामध्ये पाण्याचे प्रमाण आजूबाजूच्या वातावरण, वय, वजन यानुसार कमी जास्त असू शकते. परंतु सामन्य प्रमाणात पाणी प्यायले तर डीहायड्रेशन होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.