आपण जसे प्रगत होत आहोत, तसेच अनेक आजारांची ओळख आपल्याला होत आहे. या सगळ्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपला आहार सात्विक नसणे. शरीरात पोष्टक तत्वांची कमतरता असल्याने आपली हाडे दुखू लागतात. सांध्यांमध्ये त्रास होऊ लागतो. काहीवेळा सांध्यांमधील द्रवामध्ये हवेचे छोटे फुगे फुटतात.
यामुळे आपल्याला आवाज येतो. आणि काही वेळेस कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे सुद्धा हा आवाज येतो. गुडघ्यांमधूनही कधी-कधी असा आवाज येतो. आपल्या शरीराचा पूर्ण भार गुडघ्यावरच असतो. त्यामुळे प्रत्येक हालचालीचा भार गुडघ्यावर पडत असतो.
शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. कॅल्शिअम आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असलेच पाहिजे. तर आज आपण बघणार आहोत यासाठी योग्य उपाय.
अनेक पोषक घटक, विटामीन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात भिजवलेल्या चण्यांमध्ये असतात. चण्यामध्ये दूध आणि दह्यामध्ये जितके कॅल्शियम असते तितके आढळते. दररोज चणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अशक्तपणामुळे अनेकदा महिलांना कंबरदुखीचा त्रास होतो. अशा महिलांनी दररोज दोन मूठ चणे खाल्ल्यास फायदा होतो.
कंबरदुखीपासून सुटका मिळते. चणे हाडांसाठी खूप फायदेशीर असतात. तसेच पूर्वीपासून अनेकजण चणे आणि गूळ खातात, हे आपल्याला माहीतच असेल. म्हणूनच त्यावेळी असे हाडांचा आवाज येणे किंवा कमी वयात हाडे ठिसूळ होणे असे आजार होत नव्हते.
मेथीचे दाणे सर्वांना माहीतच असतील.
मेथीचे दाणे हे रात्री भिजवून सकाळी हे दाणे खायचे. यामुळे आपली हाडं बळकट होतात आणि आपल्या हाडांमधून कट-कट आवाज येत नाही. तसेच आपण हे दाणे नुसते सुद्धा खाऊ शकता. मात्र, हे दाणे कडू लागतात. त्यामुळे आपण हे दाणे पाण्यात भिजवून खावेत. हे अतिशय पौष्टिक असतात.
ज्यांना जास्त कडू आवडत नसेल तर त्यांनी ते पाणी प्यावे. या दाण्यांमध्ये खूप लोह असते. तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवत नाही.
म्हणून नेहमीच्या सेवनात थोड्या तिळाचा वापर नक्की करा. तीळ कच्चे खाऊ नका. शक्यतो ते थोडे भाजूनच खावेत. अशाप्रकारे आपण नेहमी आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.