घरात एक पण उंदीर, घुस राहणार नाही, एक रुपयाची वस्तू करेल कमाल.!

आरोग्य

शेताच्या ठिकाणी किंवा झाडांच्या भोवताली राहणाऱ्या लोकांना उंदरांचा त्रास होतोच. एकदा ते घरात आले की अन्नाचा नास करतात. तसेच या उंदरांना पकडण्यासाठी साप सुद्धा त्यांचा मागे फिरत असतात. काहीवेळा तर हे साप उंदरांच्या मागून आपल्या घरात येतात. तुमच्या घरामध्ये वारंवार उंदीर येत असतील.

उंदीर खूप सारा उपद्रव करत असेल. धान्य, कपडे यांचे नुकसान करत असेल. तर तुमच्यासारखेच अनेक लोक उंदीर मारण्यासाठी औषधे वापरतात परंतु औषधांचा वापर कुटुंबातील लोकांसाठी धोकादायक ठरतो तसेच ही औषधे घातलेले पदार्थ घरातील पाळीव प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांना सुद्धा हे घातक ठरू शकते.

म्हणून औषध न वापरता घरगुती वस्तू उंदीर पळवण्यासाठी कसे उपयोगी पडतात हे आपण बघू. आपल्या शेतामधून आलेलं धान्य जे साठवून ठेवतो किंवा वर्षभर पुरेल इतकं धान्य आपल्या घरी ठेवतो. या धान्याची उंदीर जर नासधूस करत असतील. तर यासाठी आपण एक तुरटीचा तुकडा घ्या. तुरटी अगदी सहज आपल्या घरात उपलब्ध असते. या तुरटीची बारीक पूड करा.

हे वाचा:   सकाळी उठल्याबरोबर हे खावे, लहान मुलांचे डोके सुपर फास्ट होईल, डोक्यावरचा चष्मा काढून फेकून द्यावा लागेल.!

ही पूड जेथे उंदराचे बीळ आहे किंवा जेथे उंदीर सारखं पोखरण्याचा प्रयत्न करत आहे अशा ठिकाणी टाकून ठेवा. या तुरटीच्या वासाने उंदीर धान्य ठेवलेल्या ठिकाणी येणार नाहीत. अशाप्रकारे तुरटी आपल्याला उपयोगी पडते. घातक औषधे वापरण्यापेक्षा आणि आपल्या पाळीव प्राण्यांचे जीव धोक्यात घालण्याऐवजी हा एक सोपा घरगुती उपाय आपण नक्कीच करू शकता.

तसेच सुकवलेली कडुनिंबाची पाने सुद्धा आपण आपले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी वापरू शकतो.
तसेच तुम्ही पुदीना सुद्धा वापरू शकता. ज्या जागेतून उंदीर घरात प्रवेश करत असेल तिथे पुदीन्याच्या तेलात कापसाचा बोळा पिळून ठेवावा. या वासामुळे उंदीर आत येणार नाही. काळी मिरी पावडर वापरून सुद्धा तुम्ही उंदरांना घराबाहेर काढू शकत.

पाण्यात काळी मिरी पावडर मिसळून बिळाजवळ शिंपडा. या वासामुळे उंदीर पळ काढतील. अशाप्रकारे नक्कीच उंदरापासून सुटका मिळवाल. तसेच आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. जर घराभोवती तुम्ही कचरा टाकत असाल किंवा उष्ट फेकत असाल तर उंदीर तिथे नक्कीच येतात. त्यामुळे स्वच्छता सुद्धा खूप महत्त्वाची असते.

हे वाचा:   रोजचे वरण खाऊन-खाऊन कंटाळा आला असेल तर करा हे हटके स्टाईल ने वरण.! तीन दिवस तोंडावर चव रेंगाळत राहील.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *