हिंदू धर्मात अनेक देवीदेवता आहे. भारतभर अनेक देवी देवतांचे मंदिरे आहेत त्यातील काही मंदिरे हे चमत्कारांनी भरलेले आहे. आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला या काही मंदिरांबद्दल सांगणार आहे. भारतात असे अनेक सुंदर आणि भव्य मंदिर आहे, जे लोकांना मोहित करत असतात. ही मंदिरे पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक मोठ्या संख्येने येतात. येथे अशी अनेक मंदिरे आहेत, जी चमत्कारिक आणि रहस्यमय मानली जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंदिरांबद्दल सांगणार आहोत, जी रहस्यांनी भरलेली आहेत, पण आजपर्यंत कोणीही ती रहस्ये सोडवू शकलेले नाही.
ज्वालामुखी मंदिर: हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात माता दुर्गाला समर्पित एक मंदिर आहे, जे ज्वालाजी मंदिर किंवा ज्वालामुखी मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या मध्यभागी एक दिवा जळत असतो, जो प्राचीन काळापासून जळत असल्याचे सांगितले जाते आणि नेहमीच तो जळत असतो. या दिव्यातून निळी ज्योत निघत असते. परंतु अजूनही हे फक्त एक गूढच आहे.
हम्पी: कर्नाटकातील हम्पी येथील विरुपाक्ष मंदिर हे स्वतःच एक गूढ चमत्कार आहे. असे म्हटले जाते की या मंदिरात असे काही खांब आहेत, ज्यातून संगीत बाहेर पडते. याला संगीत स्तंभ म्हणून ओळखले जाते. या स्तंभांबद्दल असे म्हटले जाते की एकदा ब्रिटिशांना खांबांमधून संगीत कसे बाहेर आले हे जाणून घेण्यासाठी त्यांना कापून पाहिले, परंतु आतले दृश्य पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले कारण आत काही नव्हते. खांब पोकळ होता.
शिवगंगेचे मंदिर: कर्नाटकपासून सुमारे 55 किमी अंतरावर असलेले शिवगंगेचे मंदिर एका छोट्या टेकडीवर बांधलेले आहे. असे म्हटले जाते की येथील संपूर्ण टेकडी शिवलिंगाप्रमाणे दिसते. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की येथे उपस्थित शिवलिंगाला तूप अर्पण केल्यानंतर ते चमत्काराने लोणी बनते. यामागील खरे कारण अजूनही कोणाला माहित झालेले नाही. याला भगवान शंकराचा चमत्कारच म्हणावा लागेल.
लेपाक्षी मंदिर: आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिर हे स्थापत्यशास्त्रातील चमत्कार आहे. मंदिर परिसरात एक लटकलेला खांब आहे, जो जमिनीवर विसावत नाही. याशिवाय एक दगडही आहे ज्यावर पावलांचा ठसा आहे. या पावलांच्या ठशाबद्दल असे म्हटले जाते की हे पावलांचे ठसे हे सीतेचे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदचिन्ह नेहमी ओले असते. ते कितीही कोरडे असले तरी ते आपोआप पुन्हा पाण्याने भरते. पाणी कोठून येते हे आजपर्यंत गूढच आहे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.