नमस्कार मित्रांनो, केस पिकण्याच्या समस्येने तुम्ही हैराण झाला असाल तर आजचा उपाय हा तुमच्यासाठीच आहे..! यात तुम्हाला बाजारातील कुठलाही केमिकल महागडा कलप(डाय) आणण्याची गरज नाही. नैसर्गिक पद्धतीने केसांना मुळापासून काळे करण्याची पद्धत आपण आज बघणार आहोत.
आवळा, विटामिन सी चे भांडार, केस काळे ठेवण्यासाठी मूलभूत घटक होय. आयुर्वेदात आवळ्याला अमृताप्रमाणे मानतात. सौंदर्यासाठी आवळ्याचा मोलाचा वापर होतो. रोज एक आवळ्याचे सेवन केल्याने आपली त्वचा तजेलदार आणि केस मऊसूत व काळे कुळकुळीत राहतात. असं केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे केसांचे उपचार करण्याची कधीही गरज पडणार नाही.
बाजारातील बऱ्याचशा सौंदर्यप्रसाधनांमध्ये तुम्ही पाहिल असेल ‘आवळा युक्त’ असे लिहिले असते. यावरूनच तुम्हाला समजेल आवळा किती महत्त्वाचा आहे. आवळा आपल्या केसांना मुळापासूनच काळे बनविण्यास मदत करतो. थोडेसे मोठे, रसरशीत चांगल्या क्वालिटीचे दोन आवळे घ्यावेत. त्यांना चांगले बारीक खीसावे. त्यानंतर ताज्या आवळ्याचा ज्यूस बनवून घ्यावा.
तो रस गाळून घ्यावा. पुढे ५ मध्यम आकाराचे चमचे हिना /मेहेंदी पावडर घ्या. मेहेंदी पावडर मध्ये हळू हळू आवळ्याचा रस घालून मिश्रण चमच्याने एकजीव करत राहावे. एक चमचा कॉफी पूड (एच्छिक ) त्यात मिक्स करावी. गाठी-गुठळ्या राहणार नाहीत हे बघावे. मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ असे असू नये. साधारण नेहमी डोक्याला मेहंदी लावतो त्याच प्रमाणात पातळ असावे.
आपण हात किंवा ब्रशने हा लेप आपल्या केसांवर ४५ मिनिटांसाठी लावावा. मेहेंदी मुळे केसं सिल्की होतात. कोंडा जातो. नैसर्गिक कंडिशनर असलेली मेहेंदी पावडर केसांना नैसर्गिक रंग देते. मेंहेंदी पावडर मुळे आपले केसांची त्वचा स्कॅल्प हेल्दी राहते. कॉफीमुळे केसातील एक्स्ट्रा तेल जाऊन केस वाढण्यास मदत होते. बऱ्याचदा आपण साठवणीतील आवळा पावडरीचा वापर करतो.
ते ही चांगलेच परंतु ताज्या आवळ्याचा रस जास्त प्रभावी होय. आवळा आपल्या केसांना काळे तर बनतोच पण आवळ्यामुळे आपली केस गळती थांबते व केस दाट होतात. केसं धुण्याआधी आवळा तेल व धुतल्यानंतर आवळ्याचे पाणी केसांवर स्प्रे करणं हे आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांना फाटे फुटणे बंद होईल.
आवळा सुपारी,आवळा कॅंडी, आवळ्याचे लोणचं, चटणी, मुरांबाअसे कितीतरी नाविन्यपूर्ण पदार्थ आवळ्यापासून बनवतात. भरपूर जण तसाच आवळा ही खातात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आवळा पोटात गेला पाहिजे याची खबरदारी घ्या. स्वस्त खा मस्त राहा, आपल्या केसांची काळजी घ्या.
टिप : चांगल्या फरका साठी मेहंदीचे हे मिश्रण रात्री लोखंडी भांड्यात भिजवावे. दर पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करावा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.