मित्रांनो अत्यंत महागडी औषध फेल आहेत याच्यासमोर.. धरती वरील अमृत आहे ही वनस्पती. बर्याच लोकांना असं वाटतंय आळूची पानं भाजी, फदफदं अथवा वड्या बनवण्यासाठी वापरली जातात. परंतु आज आपण या वनस्पती पासून होणारे आठ असे फायदे बघणार आहोत ज्यामुळे अनेक समस्या तुम्ही ठीक करू शकता.
जर तुम्हाला जखम झाली असेल, कानात दुखत असेल तर कमी करू शकता. विषारी किड्याने चावल असेल तर त्याचे विषाचा असर कमी करू शकता. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते याच्या सेवनाने हाडं मजबूत होतात. हाडे दुखी, सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी यांसारखे दुखणे वारंवार सतावत असल्यास त्या लोकांनी आळूचे पानांचे सेवन केले पाहिजे.
सोबतच यामध्ये विटामिन ए, विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात असतात. सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्याने हे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. ही पानं पावसाळ्यात आपोआप खूप उगवतात. आणि बाजारात देखील अगदी सहज उपलब्ध होतात. पाणवठ्याच्या ठिकाणी जास्त करून याची लागवड उत्तम होते. बिहार मध्ये अळूला अरबी असे म्हणतात.
वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो हा आळू. प्रोटीन व फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोट साफ ठेवण्यात देखील हे आपली मदत करते. रक्ताची कमतरता असलेल्यांनी या वनस्पतीच्या पानांचे सेवन अवश्य केले पाहिजे. रक्त शुद्ध करण्याचा देखील आळु आपली मदत करते. कानात वारंवार दुखत असल्यास ताज्या अळूच्या पानांचा एक दोन थेंब रस कानात टाकल्याने कान दुखी थांबते.
जखम झाली असेल आणि जखम लवकर भरून निघत नसेल तर अशात जखमेवर अळू च्या पानांचा रस लावा. हाच रस जर तुम्हाला कोणत्या विषारी किड्याने चावले असता त्यावर लावावा विष उतरेल आणि दुखणे थांबेल. अळूच्या मुळांची भाजी बनवून खाल्ल्याने सर्व कमजोरी दूर होते. अशा आहे आळू बद्दल ची ही नवीन माहिती तुम्हाला आवडली असेल. त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि ही माहिती आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्की शेअर करा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.