अवघ्या पंधरा दिवसातच केस गळती चा समस्यांपासून सुटका करेल हा उपाय. अत्यंत रामबाण, घरगुती, नैसर्गिक असा उपाय आहे. आजकाल केस गळती च्या समस्या वाढतच चालल्या आहेत. अगदी तरुणांपासून वयस्कर लोकांपर्यंत ही समस्या जवळपास सर्वांनाच भेडसावते. थोडया प्रमाणात केस गळणे हे स्वाभाविकच आहे.
पण दररोज कंगवा भर केसांचे गळालेले बुजके पाहून हृदय तुटते. आणि योग्य ते उपाय वेळेत न केल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढतच जाते. हा उपाय केल्याने तुमच्या केस फक्त गळायचेच थांबणार नाहीत तर केसांची वाढ होऊ लागेल. आणि केस कळेभोर होऊन केसांच्या इतर समस्या ही जातात. उपाय करताना एक दिवसाड करावा. सलग 15 दिवस असं करा.
तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट मिळेल. लगेच फरक जाणवल्यानंतर पुढे देखील तुम्ही हा उपाय सलग करू शकता. खूप साधा सरळ सोपा उपाय आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. पांढरा कांदा मिळाल्यास अतिशय उत्तम. नसल्यास लाल कांदा घ्यावा. आपल्या केसांच्या लांबीनुसार कांदा घेऊन तो चिरून घ्यायचा आहे.
यामध्ये पोटॅशियम, सोडियम, विटामिन ए, फॉस्फरस, व्हिटॅमिन इ, कॅल्शियम, मॅग्नेशियम असतात. कच्चा कांदा पाणी न टाकता मिक्सर मध्ये वाटून घ्या. एक सुती कपड्यातून वस्त्रगाळ करून या वाटणापासून कांद्याचा रस काढून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळाशी पाणी टाकल्यावर ते सुंदर आणि टवटवीत, तजेलदार होते त्याचप्रमाणे केसांच्या मुळाशी आपल्याला या कांद्याच्या पाण्याने मसाज करायचा आहे.
संपूर्ण स्कॅल्प ला कापसाच्या मदतीने केसांच्या मुळाशी हा रस लावून घ्यावा. तुम्ही संपूर्ण केसांनाही कांद्याचा रस लावला तरीही चालेल. सुमारे दोन ते तीन तास हे असेच केस ठेवायचे आहेत. नंतर प्रथम कोमट पाण्याने केस धुवा. नंतर मी ज्या शाम्पूने केस वाढतात का शाम्पूने केस स्वच्छ धुवा. कधीही केस धुताना एक गोष्ट लक्षात ठेवा अतिकडक पाण्याने केस धुऊ नयेत. कडक पाण्याने मुळे केस गळतात.
कांद्याचा ताजा रस लावला तर तुलनेने वास कमी येईल. वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला फरक लवकर जाणवेल. अत्यंत सोपा साधा सरळ उपाय तुम्ही नक्की करून पहा. नैसर्गिक उपायाचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. टीप : हा उपाय तेलकट केसांवर करू नये.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.