नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला वारंवार थकायला होत असेल. शरीरात अजिबात एनर्जी नसेल, रक्ताची कमतरता असेल, काही काम करण्याचे मन होत नाही, तुमच डोकं कंबर वारंवार दुखत असेल तर आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत लाडुची एक अशी रेसिपी जी एनर्जी चा खजाना आहे. हा एक लाडू खाल्ला असता पूर्ण दिवसाचे पोषक तत्व तुम्हाला मिळेल.
250 ग्रॅम अक्रोड घेवून मिक्सर मध्ये ओबडधोबड बारीक करावे. अक्रोड मध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर असते जय शरीराला ॲक्टिव ठेवते आणि रक्त वाढवते. जे थकवा डोकेदुखी आणि कंबर दुखी दूर करते. 150 ग्रॅम पांढरे तीळ आणि 75 ग्रॅम काळे तीळ एका कढईमध्ये घ्या. हे दोन्ही तीळ मंद आचेवरती कुरकुरीत भाजा. नंतर थंड करून मिक्सर वर ओबडधोबड वाटा. पावसाळा सुरू होता ज्यांना कफ होतो त्यांनी तीळ सेवन सुरू केलं पाहिजे.
तीळ हाडांसाठी खूप फायदेशीर असतात. यात लोह, प्रोटीन, विटामिन्स बी कॉम्प्लेक्स खूप असतं. हे तीळ वाढत्या वयाचे परिणाम कमी करतात आणि शरीराला ऊर्जा देतात. 150 ग्रॅम भाजून सालं काढलेले शेंगदाणे मिक्सरवर बारीक करून घ्या. शेंगदाण्यात काजू बदाम प्रमाणेच पोषक तत्व असतात आणि त्यांच्या तुलनेने स्वस्त असतात. दण्यात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात. हे पौष्टिक असतात आणि आपल्याला ताकत देतात.
हे तीनही बारीक केलेल्या गोष्टी एकत्र करून घ्या. त्यात 100 ग्रॅम साजूक तूप घाला. मिश्रण एकजीव करा. एका कढईमध्ये 750 ग्रॅम गूळ गरम करून वितळवा आणि त्यात आपले सर्व मिश्रण टाका. मिश्रण एकत्र करून थोडं थंड होऊ द्या. पूर्ण थंड करू नका नाहीतर लाडू वळणार नाहीत. लाडू वळतील इतक गरम असू द्या. हाताला तूप लावून लाडू वळून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर हे लाडू डब्यात भरून ठेवा. हे दहा-पंधरा दिवस राहतात.
असे हे लाडू रोजच्या आहारात तुम्ही जे सेवन करा. तुम्हाला थकवा कधीच होणार नाही. रक्ताची कमतरता भरून निघेल. अंग दुखी कंबर दुखी डोकेदुखी सर्वदूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.