एवढा एक उपाय करून बघा, घशाचे इन्फेक्शन कायमचे जाणार, घशाला टोचल्यासारखे वाटणे होईल बंद, खूपच सोपा उपाय…!

आरोग्य

ऋतू बदलला की संक्रमणाची भीती आणखी वाढू लागत असते. आजकाल खूपच भयंकर असे आजार निर्माण होत चालले आहेत या आजारांपासून वाचायचे असेल तर आपल्याला निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. अनेकदा चुकीच्या खाना-पीना मुळे तसेच व्हायरल इन्फेक्शन मुळे, सर्दी खोकल्यामुळे, घशामध्ये दुखू लागते, घसा सुजू लागतो, तसेच घसा लाल होणे, घशामध्ये टोचल्यासारखे वाटणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.

अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्या नंतर आपल्याला अन्नपाणी गोड लागत नाही. कारण काहीच घशाच्या खाली उतरत नाही. काही खायला गेले तर यामुळे त्रास होऊ लागतो. काही खाण्याची इच्छा देखील होत नसते. गळ्यामध्ये नेहमी सूज येत असते. घसा आत मधून खूपच लाल होऊ लागतो व टोचल्या सारखे आपल्याला वाटत असते.

हे वाचा:   दररोज फक्त एक आवळा खाल्ल्यामुळे होतात हे जबरदस्त बदल.! आवळ्याचे हे समृद्ध करणारे फायदे तुमचे डोळे उघडतील.! खाण्याचा आहे ही योग्य पद्धत.!

अशा प्रकारचा त्रास जाणवू लागल्यानंतर आपण खूपच हैराण होत असतो. अशावेळी काही काळजी करण्याची गरज नाही काही सोपे उपाय केले तर अशा प्रकारची समस्या देखील अगदी सहजपणे नष्ट होऊ शकते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घशा संबंधीच्या कोणत्याही प्रकारचा विकार उद्भवला तर पटकन हा उपाय करायचा याने नक्कीच आराम मिळेल.

अनेकदा टॉन्सिल मध्येदेखील इन्फेक्शन होत असते त्या कारणामुळे देखील घसा दुखू लागतो. अशा वेळी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा साधे मीठ दोन ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याला चांगल्या प्रकारे उकळवून घ्यावे. याला चांगल्या प्रकारे गाळून घ्यावे व रात्री झोपायच्या काही वेळ अगोदर या पाण्याच्या गुळण्या कराव्यात सकाळी घसा अगदी मोकळा झालेला तुम्हाला दिसेल.

 

घशासंबंधीचा विकार उद्भवला म्हणजे सर्वात सोपा असा उपाय म्हणजे कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ टाकावे व या पाण्याने गुळण्या कराव्यात. गुळण्या करताना पाणी घशापर्यंत जाऊन पुन्हा बाहेर फेकले जाईल. अशा प्रकारे गुळण्या कराव्या. म्हणजेच चांगल्या प्रकारे घसा शेकला जाईल याची काळजी घ्यावी. असे केल्याने घशासंबंधी चा सर्व विकार नष्ट झालेला तुम्हाला दिसेल.

हे वाचा:   खाज खरुज नायटा याची दोन दिवसात झाली सुट्टी.! तीन वर्ष जुना खरुज या गावरान उपायाने राहिला शांत.! एकदा करावाच लागेल.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *