मित्रांनो फक्त 21 दिवसांमध्ये तुम्ही विरळ केसांना दाट करून दुप्पट वाढवू शकता. गळणारे केस थांबून होतील काळेभोर व दाट! तेही बाजारातील अनेक महागडी उत्पादन न वापरता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. हा उपाय नैसर्गिक असल्यामुळे तुमचा केसांना कोणताही धोका नाही. हा उपाय तुमच्या केसांची नीट काळजी घेईल व प्रदूषण पासून होणारे केसांचे नुकसान टाळता येईल.
यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदूळ. तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. कारण याला बोरिक पावडर असं काही लावलेले असू शकते. तुटलेले केस ठीक करण्यासाठी, केस पुन्हा उगवण्यासाठी तांदुळाचा वापर अत्यंत फायदेशीर आहे. तांदूळा मध्ये असणारे विटामिन्स आणि मिनरलस यामुळे आपल्या केसांवर असा एक लेयर तयार होतो ज्यामुळे प्रदूषणापासून आपले केस खराब होत नाहीत. आपले केस चमकदार राहतात.
ज्या प्रमाणात तांदूळ धुवून घेतले आहे तेवढेच पाणी घेऊन त्या पाण्यात तांदूळ चाळीस मिनिटे भिजत ठेवा. हे पाणी गाळून घ्या. केसांसाठी हे पाणी वरदानच आहे. नंतर यामध्ये आपण दोन असे घटक टाकणार आहोत जे आपल्या घरी सहज उपलब्ध असतात. ते आहेत आवळा पावडर आणि खोबरेल तेल. आवळा मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते. त्यामुळे केस वाढण्यास मदत होते.
सोबतच केसांच्या मुळांशी होणारे इन्फेक्शन थांबते. केसात खाज येणे कोंडा होणे यांसारख्या समस्या होत नाहीत. परिणामी केस गळती थांबते. तांदळाच्या पाण्यामध्ये एक चमचा आवळा पावडर घाला. यांनतर दोन चमचे खोबरेल तेल या मिश्रणामध्ये घाला. खोबरेल तेल आपल्या केसांना मोईसच्यूरायझ करण्याचे काम करेल ज्यामुळे आपले केस मुलायम चमकदार होतील.
आणि चमच्याने हे तीनही घटक एकत्र करून घ्या. हे बनवण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. अथवा हे तुम्ही रात्री बनवून सकाळी वापरू शकता. हे मिश्रण तुम्ही गाळून घेऊन कोणत्याही काचेच्या बाटलीमध्ये अथवा स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही हेअर ट्रीटमेंट ची गरज भासणारच नाही. केस लांब सडक होतील.
हा उपाय करतेवेळी लक्षात घ्या तुमच्या केसांना आधीपासूनच तेल नको आहे. नाहीतर याचा फायदा तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला केसांच्या मुळांशी लावायचे आहे. स्प्रे बॉटनी डायरेक्ट केसांच्या मुळांशी लावल्यास उत्तम. हलक्या हाताने केसांच्या मुळांशी मसाज करावा. तुम्हारे एक ते दोन तास केसांवर हे असेच राहू द्या. त्यानंतर हर्बल शाम्पूने केस स्वच्छ धुवा.
आठवड्यातून तीनदा याचा उपयोग करा. एकवीस दिवस हा उपाय करून बघा तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे फरक जाणवेल. पहिल्यापेक्षा अधिकच मजबूत, सुंदर व दाट होतील तुमचे केस..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.