५ मिनिटं लागेल: कोलगेट ने ब्लॅकहेड्स करा गायब.! त्वचा होईल अशी जसे कधी ब्लॅकहेड्स नव्हतेच!!

आरोग्य

मित्रांनो चेहऱ्यावरती व्हाइट हेड्स आणि ब्लॅक हेड्स येणे ही आजकाल सर्वसाधारण बाब झाली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक असा उपाय की कसे तुम्ही आपल्या चेहऱ्यावरील व्हाइट हेड्स आणि ब्लॅकहेड्स खास करून नाकाच्या आसपास असणारे या गोष्टी कशा दूर करू शकता. त्वचेवरील ऑइल वाढल्याने त्यावर प्रदूषणामुळे धूळ आणि माती जमते आणि आपल्याला ब्लॅकहेड्स ची समस्या सतावू लागते.

आज आम्ही तुमच्यासाठी इतका अद्भुत उपाय घेऊन आलो आहोत की केवळ पाच मिनिटांमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील व्हाईट आणि ब्लॅक हेड्स नष्ट होऊन बेबी सॉफ्ट अशी तुमची त्वचा होईल. यासाठी तुम्हाला प्रथम एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्यायचे आहे. दुसऱ्या एका रिकाम्या बाऊलमध्ये तुम्हाला टूथपेस्ट घ्यायची आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची टूथपेस्ट वापरू शकता.

ती पांढरी असावी जेलयुक्त नसावी. आम्ही कोलगेट वापरण्याचा सल्ला देऊ. तुमच्या नाकाचा अवतीभवती किंवा शरीरावरती कोठेही ब्लॅकहेड्स व्हाइट हेड्स जितके असतील त्या प्रमाणामध्ये ही टूथपेस्ट घ्या. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दोन चिमूटभर भरड पिठीसाखर. हे भरड पिठीसाखर तुम्ही घरी बनवू शकता. नेहमीच्या साखरेला मिक्सर वर जाडसर वाटून घ्या.

हे वाचा:   लांबसडक केसांसाठी जास्त काही नाही करावे लागते हे छोटेसे काम.! अनेक महिला यामुळे आहेत खुश.!

पुढील घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे नारळाचे तेल. हे तेल आपली त्वचा साफ ठेवण्यासाठी आपल्याला मदत करेल. आठ ते दहा थेंब नारळाचे तेल यामध्ये मिसळा. हे मिश्रण एका मऊ दात घासायचा ब्रश ने एकत्र करा. भरड पिठीसाखर एक स्क्रबर प्रमाणे काम करेल. त्वचेवर ज्या भागावर व्हाइट हेड्स आणि ब्लॅक हेड्स आहेत ते प्रथमत: त्या गरम पाण्याने साफ करून घ्या.

यामुळे तुमच्या त्वचेचे छीद्र ओपन होतील. नंतर त्या भागावर ब्रश ने आपण तयार केलेली पेस्ट पूर्णपणे कव्हर होईल असे लावावे. पाच मिनिटे हे वाळण्यासाठी असेच ठेवावे. पाच मिनिटांनी वाळल्यानंतर पुन्हा ब्रश नेच ते काढा. हलक्या हाताने ‘रब’ करत दोन मिनिटात काढा. केवळ एका वापरातच तुम्हाला फरक जाणवेल. दोन वेळा वापरल्याने सत्तर ते ऐंशी टक्के ब्लॅकहेड्स व्हाइट हेड्स निघून जातात.

हे वाचा:   फक्त एकदा लावा खाज खरुज पुन्हा दिसणार पण नाही.! डॉक्टरांना देखील हैराण करून सोडेल हा उपाय.! एकही डाग उरणार नाही.!

आठवड्यातून दोन ते तीन वेळेस तुम्ही हा प्रयोग करू शकता. हा प्रयोग करून झाल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने साबण न लावता धुवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *