मित्रांनो, काय तुम्ही झुरळांचा समस्येने त्रस्त आहात? बाजारातील कोणतेही केमिकल युक्त उत्पादन वापरून देखील तुमच्या घरातील झुरळे पूर्णपणे संपलेली नाहीत? मुळात घरामध्ये झुरळं असण म्हणजे अनेक प्रकारच्या रोगांना निमंत्रण देणं होय. घाण आणि अस्वच्छता हेच झुरळांच्या जन्माचे कारण आहे. एका मागं एक अस्वच्छतेमुळे झुरळांची संख्या वाढतच जाते.
असे घाणेरडे झुरळं जर तुमच्या स्वयंपाक घरात फिरकत असतील तर तुमच्या घरातील व्यक्ती नक्कीच आजारी पडतील असे समजून जा. अशा प्रकारचे झुरळं तुमच्या घरातून पळवून लावण्यासाठी आम्ही काही उपाय तुम्हाला सुचवत आहोत. 1. तमालपत्र : प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात मसाल्याचा डब्यात तमालपत्र सहज आढळते. वाळलेल्या तमालपत्रांचे चूर्ण बनवून घरातील कोपऱ्यात अथवा जिथे झुरळ येतात त्या जागी टाकले असता, त्याच्या वासाने घरात लपलेले सर्व झुरळं बाहेर निघून जातात.
2. बोरिक पावडर : तुम्हाला माहित आहे का झुरळ पळवून लावण्यासाठी बोरीक पावडरचा देखील वापर होतो. दोन मोठे चमचे बोरीक पावडर गव्हाच्या पिठात मिसळून कणीक तयार करा. या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून झुरळ येतात त्या जागी ठेवा. लवकर झुरळ पळून जातील. 3. बकिंग सोडा : एक कप बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये दोन चमचे साखर घालून पाणी घालून एक घोळ बनवून घ्या. हा घोळ घरातील कोपऱ्यांमध्ये अथवा झुरळ येतात त्या जागी टाका. हा घोळ खाऊन झुरळ मरून जातात.
4. लवंग : घरातील कोपऱ्यांमध्ये व झुरळं येण्याच्या जागेवरती लवंग टाका. त्यामुळे घरामध्ये झुरळ येण्याची संभावना कमी होते. सोबतच आधीच घरामध्ये झुरळ असतील तर त्यांना तेव्हा त्यांना लवंग चा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते पळू लागतात. 5. खीरा : खीरा याचा उपयोग सॅलेड मध्ये खाण्यासाठी तर होतोच सोबतच फिरणाऱ्या झुरळा पासून सुटका करण्यातही याचा फायदा होतो. त्यासाठी तुम्हाला फक्त खिरा चे काप झुरळ येण्याच्या जागी ठेवायचे आहेत त्याच्या वासाने आपोआपच झुरळ निघून जातील. खीरा जिवाणूंच्या वाढीस रोख लावते.
6. अंड्याची सालं : अंड्याची सालं झुरळ पळवून लावण्यामध्ये अत्यंत लाभदायी आहेत. झुरळांना अंड्याचा वास आवडत नाही त्यामुळे तुम्ही अंड्याची टरखलं झुरळ येण्याच्या जागी ठेवून देऊ शकता.
7. रेड वाईन : स्वयंपाक घरात रेड वाईन ठेवल्याने झुरळ पळून जातात. एका वाटीत रेड वाईन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा. हे पिऊन झुरळ मरतील. 8. रॉकेल : रॉकेल मधनं येणारा स्ट्रॉंग वास झुरळांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळे रॉकेलच्या फवाऱ्याने झुरळ तो वास सहन न करता आल्यामुळे पळून जातात.
9. कॉफी पावडर : सगळ्यात अनोखा आणि सटीक उपाय झुरळांना पळवून लावण्यासाठी आहे तो म्हणजे कॉफी! कॉफीच्या बिया अथवा कॉफी पावडर जिथे झुरळ येतात त्या जागी ठेवावे. कॉफी झुरळांना खूप आवडते. परंतु हीच कॉफी त्यांचा जीव घेते. झुरळ कॉफी पावडर खाऊन मरून जातात. मात्र नंतर तुम्ही या जागेची नीट स्वच्छता करा. 10. कांदा : तुम्हाला माहित आहे का कांदा झुरळांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे! कांदा चा रस काढून स्प्रे बॉटल मध्ये भरा. आणि हा रस झुरळांनी प्रभावित क्षेत्रामध्ये फवारा. काही दिवसातच झुरळांची समस्या तुमच्या घरातून संपेल.
वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला आवडेल तो उपाय तुम्ही करून बघू शकता. परंतु सोबतच आपल्या घरातील कोपरान् कोपरा ची सफाई करण्यास तुम्ही विसरू नका.. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. हे उपाय/प्रयोग तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.