आयुर्वेदात या वनस्पतीला मानले जाते अमृत, याच्या अशा वापराने अनेक रोग दूर पळून जातात.!

आरोग्य

मित्रांनो, आपला भारत देश वेगवेगळ्या जडीबुटी ने पूर्ण नटलेला आहे. भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचे औषधी आयुर्वेदिक जडीबुटी आढळते. बऱ्याच लोकांना त्याची ओळख पारख नसल्यामुळे ते बऱ्याचदा गवत समजून दुर्लक्ष केले जाते. माहिती नसल्यामुळे अनेक जडीबुटी त्यांचा वापरच होत नाही परंतु आम्ही तुम्हाला बऱ्याच छोट्या-मोठ्या ओळखीच्या अनोळखी च्या जडीबुटी बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत राहतो.

आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत सुंदर वनस्पतीच्या बद्दल. या वनस्पतीला चिरचिटा’, ‘लटजीरा’, ‘चिरचिरा’ अशी नावं आहेत. हे अत्यंत साधंसुधं रोप असतं जे रस्त्याच्याकडेला केव्हा झाडीमध्ये सहजपणे आढळते. याला अपमार्ग या नावाने देखील ओळखतात. ही एक औषधी जडीबुटी आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात अंकुरित होते. थंडीच्या दिवसात फुलते, बहर येतो. त्याच्या बिया तांदळा प्रमाणे असतात.

या वनस्पतीच्या दोन प्रजाती आहेत एक आहे सफेद आणि दुसरे लाल. परंतु दोन्हींच्या गुणधर्मांमध्ये काही खास फरक नाही. याच्या सेवनाने तुम्हे दातदुखीचे समस्या दूर करू शकता. तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुम्ही त्याचा इलाज करू शकता. चर्मरोग, डाग, खाज-खुजली, गजकर्ण, नायटा, खरुज यापैकी समस्या असतील तर या देखील दूर करू शकता. अगदी मुतखड्याची समस्या असेल तर तीदेखील खडा विघळून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

हे वाचा:   भात की चपाती.! भात आणि चपाती खाण्याचा हा नियम माहिती आहे का.? कधी काय खावे हे नक्की जाणून घ्या.!

सोबतच सांधेदुखी गुडघेदुखी हीदेखील दूर करू शकता. भस्म्या रोग म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त भूक लागते अशा प्रकारच्या विचित्र आजारांमध्ये देखील ही वनस्पती लाभदायी ठरते. कुठे जखम झाली असेल किंवा विषारी किडा चावला असेल तर याचा उपचार देखील तुम्ही करू शकता. विषारी किडा किंवा विंचू चावला असता, या वनस्पतींच्या पानांचा रस लावला असता विश त्वरित उतरेल.

सांधेदुखी गुडघेदुखी हे सतावत असतील तर या वनस्पतीचे 10 ते 12 पाने गरम करून घ्या, आणि संध्यावरती बांधा. याने खूप आराम मिळतो. तर तुम्हाला मुतखड्याची समस्या असेल तर लहान वनस्पतीचे ताजी मुळ 10-15 ग्रॅम घ्या. ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये वाटून घ्या. याचे पाण्याबरोबर सेवन केल्याने मुतखड्यात आराम मिळतो. ही औषधे किडनीचा स्टोन तुकडे-तुकडे करून बाहेर टाकते.

हे वाचा:   भेंडी ठरली केसांसाठी सर्वात रामबाण औषधी.! भेंडी केसांना अशी लावल्यास केस दुपटीने वाढू लागतात तसेच केसातला कोंडा होतो गायब.!

चर्म रोगाची समस्या असेल तर त्या वनस्पतीचे पानं वाटून त्वचेवर त्या जागी लावा फोड, फुटकुळ्या असतील तर त्याही जातील सोबतच खरूज, नायटा, गजकर्ण, दाद खाज-खुजली यांसारख्या समस्यांमध्ये देखील आराम मिळतो. जखमेचे समस्या असेल तर या वनस्पतीच्या मुळांचा काढा बनवून ती जखम त्या पाण्याने सकाळ संध्याकाळ धुवा तुमची जखम लवकर भरून निघेल.

भस्म्या रोग असेल तर या वनस्पतींच्या बियांचे चूर्ण 3 ग्रॅम घ्या. दिवसातून दोन वेळेस असं सलग एक आठवडा घेतल्याने अत्याधिक भुक लागण्याची समस्या ठीक होईल. या वनस्पतीच्या पानांचा रस काढून त्यात कापूस बुडवून दुखणाऱ्या दातावर लावा. तुम्हाला आराम मिळेल. आशा आहे आज दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल. तुला मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही याचा फायदा करून घ्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *