फक्त तीनच दिवसात गुडघ्याचे दुखणे गायब होईल, गुडघे दुखी वर करा आता शेवटचा इलाज.!

आरोग्य

मंडळी, आपल्या वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत राहतात. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखी यासारख्या सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या समस्या नेहमीच आपल्याला जाणवतात. याकडे दुर्लक्ष करत वेळीच उपाय केला नाही तर तेच किरकोळ वाटणारे दुखणे पुढे रौद्ररूप धारण करू शकते.

आपल्याला अंथरूणाला खिळून ठेवू शकते, मोठ्या प्रमाणात औषध आणि हॉस्पिटलच्या बिलाने आपल्या खिशाला कात्री लागू शकते. आजकाल तर लहान वयामध्ये सुद्धा गुडघेदुखीची समस्या जाणवते. कारण तरुणांमध्ये व्यायामाची जागरूकतेच प्रमाण अत्यंत कमी होत चाललेले आहे. बदलती जीवनशैली यामुळे वाढणारे वजन आणि त्याचा येणारा गुडघ्यांवरती ताण याकडे कोणाचेच लक्ष नाही.

या सोबतच खाण्यापिण्यात मध्ये पौष्टिक पदार्थ नसल्यामुळे हाडांना गुडघ्याला वंगण मिळत नाही. आणि लहान वयापासूनच गुडघेदुखीची समस्या समोर दत्त म्हणून उभी राहते. गुडघेदुखी आणि यामुळे होणारे त्रास यापासून भविष्यात वाचायचं असेल तर आपल्याला आहाराकडे फार लक्ष दिले पाहिजे. दुसरी गोष्ट नियमित व्यायाम केला पाहिजे.

तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपले वजन हे वय आणि उंची या प्रमाणात नियंत्रणात ठेवले पाहिजे. अन्यथा कमी वयात मसाज तेलाचा बाम चा वास अंगाला येत राहील.. अर्थात उतार वयामध्ये होणाऱ्या गुडघेदुखी वरील उपचार कमी वयातच करावे लागतील. भविष्यात पुढे knee -tranplanst, गुडघ्यात पाणी कमी जास्त होणे यांसारखे त्रास देखील उद्भवतात.

हे वाचा:   चिकन मटन बनवताना हे दोन मसाले टाका.! जबरदस्त चव येईल.! हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल असे मटन घरीच बनवा.!

तेव्हा आपले आरोग्य आपल्याच हातात आहे, वेळीच याची काळजी घेतली पाहिजे. आपल्यापैकी बर्‍याच जणांना सगळ्यात वाईट सवय असते ती म्हणजे, दुखणे सुरू झाल्यावरती व्यायाम करणे. इथे एक गोष्ट आम्ही तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो की, व्यायाम हा रोज केला जातो दुखणे सुरू झाल्यावर स्नायुंना त्रास देऊ नये. शरीराचा कोणताही भाग दुखत असल्यास त्यावर व्यायाम करून ताण देऊ नका.

गुडघे दुखी किंवा कोणतीही स्नायू दुखी, सांधे दुखी असेल तर काय करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि हे होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल आम्ही तुम्हाला वर सांगितले आहेच. आजच्या या उपायात आपल्याला लागणारा पहिला घटक आहे अर्धा चमचा सुंठ पावडर. आजकाल बजारात सुंठ पावडर सहज उपलब्ध होते. दुसरा घटक आहे शुद्ध हळदी पावडर (बाजारातील आयती हळद पावडर मध्ये भेसळ असते.)

एक ग्लास पाणी भांड्यात घ्या. यात अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घाला. यात दोन तमालपत्र घाला. हे पाच ते सात मिनिटं उकळवा. हे सकाळी गाळून गरमच रिकाम्या पोटी किंवा दिवसभरात चहा पितात असे प्या. गुडघेदुखी होऊ नये आणि झाल्यास देखील हा उपाय फायदेशीर आहे.

हे वाचा:   सिताफळाचे सेवन करणारे लोक नक्की वाचा, या काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असते.!

गुडघेदुखी झाल्यावर मसाज करण्यासाठी एक तेल कसे बनवायचे ते आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. यासाठी तुम्हाला लागणार आहे तीळ किंवा मोहरी चे तेल लागणार आहे. दोन वाटी तेलात पाच लवंग, एक चमचा ओवा, पाच सात सोललेल्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा आंबेहळद घाला. हे तेल चमच्याने मिक्स करून लसूण लाल होईपर्यंत चांगले शिजवा.

गाळून घेऊन या तेलाने मालिश करा. या तेलाने मालिश केल्याने सर्व प्रकारचे दुखणे थांबेल. रात्री या तेलाने मालिश करताना जुने कपडे घाला म्हणजे डाग पडणार नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *