आता तुमचे पिवळे दात लोकांना दाखवत बसू नका.! अर्धे टॉमेटो पिवळ्या दातांना पांढरे शुभ्र करून टाकेल.!

आरोग्य

अनेकदा आपले दात काही कारणास्तव पिवळे होतात आणि नंतर ते पांढरे करण्यासाठी आपल्याला डॉक्टर जवळ जाऊन म्हणजेच कोणत्यातरी डेंटिस्ट जवळ जाऊन त्यावर उपाय करावे लागतात आणि त्यासाठी आपले भरपूर पैसे खर्च होत असतात. किंवा आपण असे काही औषधे वापरत असतो त्याची किंमत देखील जास्त असते आणि त्यात देखील आपले खूप पैसे खर्च होत असतात म्हणून आज आपण असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत.

जो बनविण्यासाठी आपल्याला घरातील छोटे मोठे साहित्य लागणार आहे. हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत देखील लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोणकोणते सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय बनविण्याची प्रक्रिया काय असणार आहे. सर्वप्रथम आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो.

टोमॅटो कापायच्या आधी त्याला थोडासा हाताने दाबून किंवा कशाचा तरी सहाय्याने दाबून घ्यायचे आहे जेणेकरून कापल्यानंतर त्याचा ज्यूस आपल्याला मिळेल. त्यानंतर आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने दाबून त्यातील ज्यूस काढून घ्यायचा आहे. आपल्याला गाळणचा वापर करायचा आहे,जेणेकरून त्यामधील बिया ज्यूस मध्ये पडू नये आणि आपल्याला फक्त जूस मिळेल.

हे वाचा:   रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर चहामध्ये मिसळा फक्त या २ गोष्टी.!

टोमॅटोमध्ये अनेक औषधी गुणधर्म त्याचबरोबर टोमॅटो आपली त्वचा गोरी करण्यासाठी काम करतो. जर आपल्या त्वचा टॅन झाली असेल तर ती देखील उजळ होण्यास मदत होते त्याचबरोबर आपले दात देखील टोमॅटोचा वापर केल्याने उजळ होणार आहेत. आता आपल्याला लिंबुचा देखील वापर करायचा आहे आणि ज्या वाटीमध्ये आपण टोमॅटोचा रस काढून घेतला आहे त्याच वाटी मध्ये एक चमचा लिंबाचा रस देखील पिळून आणि गाळून घ्यायचा आहे.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृ’दयरोग, मू’त्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते. हे आपल्या पाचनतंत्रास देखील दुरुस्त करते. त्याचप्रमाणे अँटिबायोटिक देखील असते त्यामुळे आपले दात स्वच्छ आणि त्यातील किटाणू मारण्यासाठी देखील मदत होते.

त्यामुळेच आपल्याला लिंबाच्या रसाचा देखील वापर करायचा आहे. त्यानंतर यामध्ये एक चमचा टूथपेस्ट देखील टाकायची आहे जेणेकरून आपल्याला आपले दात अजून पांढरे होण्यास मदत होईल. आता हे मिश्रण तोपर्यंत मिक्स करायचे आहे जोपर्यंत ते एकत्रितपणे एकजीव होत नाही. मिक्स करून झाल्यानंतर आपल्या दातांवर त्यांना जसे आपण दररोज ब्रश करतो त्या प्रकारे ब्रश करायचे आहे आणि कमीत कमी पाच ते दहा मिनिटे आपल्याला ब्रश करायचे आहे.

हे वाचा:   ना व्यायाम ना कोणतेही औषध, फक्त हे दहा दिवस पित रहा, 15 किलो वजन कमी होईल.!

त्यानंतर कोमट पाण्याने तोंड धुऊन घ्यायचे आहे. या उपायाचा एका वापरामध्ये तुमचे दात पांढरे शुभ्र दिसू लागतील. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याचा वापर दररोज देखील करू शकता. पाण्याच्या एका आठवड्याच्या वापराने तुम्हाला भरपूर फरक दिसून येईल आणि तुम्हाला याचा वापर परत करावाच लागणार नाही एवढे शुभ्र तुमचे दात होऊन जातील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *