म्हणून येतात डोळ्याखाली डार्क सर्कल, आजपासूनच हे एक काम करा आहे ते वर्तुळे होतील गायब.!

आरोग्य

चेहऱ्यावर डोळ्यांखाली काळी वर्तुळे जमा होण ही आज काल एक सामान्य गोष्ट झाली आहे. वयोमानानुसार ही काळी वर्तुळ येणे सहाजिक आहे आणि त्याचे काही फारसे वाटत नाही नाही कारण वाढत्या वयाप्रमाणे शरीरात अनेक पोषक तत्वांची कमतरता होत जाते त्याचा परिणाम चेहऱ्यावर शरीरावर त्वचेवर दिसू लागतो. आणि त्यावेळेस आपण याची फार काळजी घेऊ शकत देखील नाही.

परंतु पंधरा ते अठरा वयापासूनच असे समस्या असेल तर मात्र चिंतेची बाब आहे. मुलं-मुली अगदी कोणालाही ही समस्या सतावते. मुलींना तर या समस्याची जास्त चिंता वाटते कारण त्यांच्या मेकअप मध्ये सौंदर्यात ही काळी वर्तुळं अडथळा आणतात. काळी वर्तुळं का होतात? ते होऊ नयेत यासाठी कशी निगा राखावी?

झाल्यास काय उपाय करावेत आणि अन्नपदार्थांमध्ये आहारात काय बदल करावेत याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. वाढत्या टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये मोबाईल कॉम्प्युटर टीव्ही यांचादेखील अतिवापर होत आहे. त्यामुळे डोळ्यावरती अतिरिक्त ताण येतो. परिणामी आपल्या डोळ्यांभोवती रक्तवाहिन्या मोठ्या होऊन आपल्या डोळ्याभोवतालची त्वचा काळी पडू लागते.

यालाच आपण डार्क सर्कल अथवा काळी वर्तुळे म्हणतो. कमी वयामध्ये व्यक्ती थकलेली प्रौढ दिसू लागते. त्वचा निस्तेज होते. त्याचा परिणाम मानसिकतेवर होतो. आयुर्वेदात सांगितल्यानुसार डोळे हे पित्त आणि मज्जा धातूचे आहेत. पित्त, वात आणि दूषित रक्त या मुळे आढळून येतात काळी वर्तुळे! अनुवांशिकता हेदेखील प्रामुख्याने कारण होय.

हे वाचा:   अंजीर खाण्याआधी ते बनले कसे जातात ते तर बघा.! अंजीर कसे बनते हे नक्की वाचा.!

रात्रीचे जागरणे, अपुरी झोप, पोट साफ नसणे, चहा-कॉफीचे अतिसेवन, जास्त उन्हात फिरणे, जीवनसत्त्वांचा अभाव, ऍलर्जी, मीठाचे अतिसेवनामुळे डार्क सर्कल्स दिसू लागतात. डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागल्यास सर्वात आधी अतिरिक्त सौंदर्यप्रसाधनं वापरणे थांबवावे. यामधील केमिकल्स मुळे हे शरीराला डोळ्यांना ठरू शकते घातक. वेळीच उपचार न घेतल्यामुळे याचा आकार वाढण्याचा आणि रंग जास्त दाट होण्याची शक्यता असते.

रक्तदाब नियंत्रित नसल्यास देखील काळी वर्तुळे वाढू लागतात. अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारे तुम्ही उपचार केल्यास लवकर सुधारणा दिसून येते. टाळ्या वर्तुळ यामुळे डोळ्यावर किंवा दृष्टीवर कोणताही परिणाम होत नाही परंतु चेहऱ्यावर मात्र कुरुपता दिसू लागते. पोषक तत्वांचा अभाव किंवा जुना आजाराचं लक्षण म्हणून देखील काळे वर्तुळे येतात. पाहुयात घरगुती उपाय..

त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक काकडी, एक बटाटा, पाव वाटी कच्च दूध, विटामिन ई ची एक गोळी, मध, नारळाचं तेल, कोरफडीचा गर, गुलाबपाणी..! कच्च निरस दूध घ्या. यात कापूस( cotton pad) बडवून फ्रीजमध्ये ठेवून द्या. वेळ असेल तेव्हा डोळ्यावरती हे 15 मिनिटं ठेवा. काकडी व बटाटा यामुळे डाग कमी होतात. दोन्ही बारीक किसून घ्या. सम प्रमाणात दोन चमचे घ्या. यात एक चमचा मध आणि कोरफड गर घाला.

हे वाचा:   नसांमध्ये कमजोरी, सूज, नसा ब्लॉक होणे, सर्व समस्या असतील तर चिंता करू नका.! हे एक काम करा, आठ दिवसात सगळं काही आपोआप ठीक होईल.! जाणून घ्या कसे.!!!

हे हे सर्वांना एकत्र करून चेहर्‍यावर तसेच डोळ्यांच्या खाली काळ्या वर्तुळावर लावावे. व्हिटॅमिन गोळी घेऊन यात एक चमचा गुलाबपाणी घेऊन बोटानेच डार्क सर्कलवर मसाज करून रात्री झोपा. नारळ तेल कोरफड जेल मिक्स करून ठेवा. हे देखील काळ्या वर्तुळांवर लावून बघा. या उपायांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पोटा मधून महामंजिष्ठादि काढा पिल्याने देखील खूप फायदा होतो. रोज सकाळी दोन भिजलेले बदाम खावेत.

टिप्स : १. मुबलक प्रमाणात शरीराला पाण्याची आवश्यकता असते. तेव्हा भरपूर पाणी प्या. २. प्रकृतीने थंड असलेली फक्त काकडी काप करून डोळ्यावर ठेवा. ३. आहारामध्ये विटामिन सी व ई असलेले अन्नपदार्थ वाढवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *