नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला जास्वंदीच्या फुलांच्या औषधी उपयोग यांबद्दल माहिती सांगणार आहोत. लाल तांबडे जास्वंदाचे फुल गणपतीबाप्पांना अतिशय प्रिय आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला तुम्ही अनेक ठिकाणी ही फुले पाहिले असतील. तसं तर आजकाल जास्वंदीची फुले आणि विविध रंगात आकारात प्रकारात आढळतात. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसतो परंतु तरीदेखील ही वनस्पती लोकप्रिय आहे.
असं म्हणतात जास्वंदी मध्ये एक हजार सूक्ष्म रंगछटा आहेत. आपल्याकडे अनेक घरात पूजा मध्ये या फुलाचा वापर केला जातो. इतकेच काय ते आपल्याला माहिती असते. परंतु आज आपण जाणून घेऊया त्याचे औषधी फायदे. फायदे हे जाणून घेतल्यावर तुम्ही देखील जास्वंदीचे रोप आजच आपल्या बागेत लावाल. किंवा वापरलेली जास्वंदीचे फुले टाकून देणार नाही..
चला तर मग जाणून घेऊयात औषधे माहिती जास्वंदीच्या फुलांची.. जास्वंदीच्या फुलांचा उपयोग हा केस धुण्यासाठी देखील केला जातो. तुम्ही आज काल सौंदर्यप्रसाधनं बघितली असतील तर अनेक शाम्पू मध्ये तेलामध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पानांचा आणि फुलांचा अर्काचा समावेश केला जातो. अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये रंग सरबतं साठी किमान जाम जेली सारख्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये देखील जास्वंदीचा वापर केला जातो.
हे ऐकून कदाचित तुम्हाला नवल वाटेल. आज काल बऱ्याच ठिकाणी जास्वंदीच्या चहा लोकप्रिय होत असताना दिसत आहे. असा चहा ज्यामध्ये जास्वंदाच्या फुलांचा समावेश आहे. डीप डीप पुड्या हा प्रकार जास्वंदीच्या चहा मध्ये वापरला जातो. जास्वंदीच्या फुलांमध्ये लोह, कॉपर, झिंक, विटामिन सी, विटामिन बी1, बी 2 असे अनेक जीवनसत्व असतात. या चहाच्या सेवनामुळे ते आपल्या शरीराला मिळतात.
या प्रयोगामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी होते तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु आपल्या शरीरातील मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी देखील असे पेय पिले जाते. हे पेय अत्यंत पाचक असते. जास्वंदीच्या फुलांमध्ये अँन्टिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. आज काल आपल्या अवतीभवती दर दहा लोकांमागे सहा लोक तरी नैराश्याने ग्रस्त असलेले दिसतात.
अशी उदासीनता असलेले लोक यांनी जर जास्वंद युक्त चहा दिल्यास त्यांना अत्यंत लाभ होतो. अनेक घरांमध्ये जास्वंदीच्या फुलांचा वापर करून काढा बनवतात. हा काढा रुदय रोगामध्ये देखील अत्यंत गुणकारी असतो. उच्च रक्तदाब असलेल्यांनी जास्वंदीच्या पानांचा काढा अवश्य करावा. यामुळे शारीरिक थकवा दूर होऊन शरीर राहते तंदुरुस्त आणि स्फूर्तीदायक.
आजकाल तरुण दिसावं यासाठी अनेक लोक धडपडत असतात. अँटी एजिंग या समस्येवर जास्वंदाचे पान हे अत्यंत प्रभावशाली पणे काम करतात. जास्वंदीच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने लवकर सुरकुत्या पडत नाहीत. या लोकांना केस गळतीची समस्या आहे त्यांसाठी जास्वंद म्हणजे वरदानच होय. अकाली केस पिकणे केस कोरडे अथवा रुक्ष होणे यांसारख्या केसांच्या तक्रारींमध्ये जास्वंद खूप कामी येतात.
वाळलेल्या जास्वंदीच्या फुलांचा पावडर बनवून घ्या. ही पावडर लागेल त्या प्रमाणामध्ये पाण्यात मिसळून तुम्ही केसांवर देखील फवारू शकता. केसांना लावण्यासाठी खोबरेल तेलामध्ये वाळलेली जास्वंदी घालून उकळवून लावा. केस गळती रोखली जाईल. यासोबतच जास्वंदीच्या पानांची पेस्ट बनवून केसांवर लावून केस स्वच्छ धुऊन टाका. आवळा पावडर, जास्वंदीच्या फुलांची पावडर तेलामध्ये मिसळून केसावर मालिश करा.
तुमचे केस गळती हळूहळू कमी होऊन पूर्णतः बंद होईल. टिप्स • ब्राम्ही, माका, नागरमोथा, जांभूळ बी पावडर आणि जास्वंदाचे फुल एकत्र उकळून त्याचं पाणी काचेच्या बाटलीत भरून ठेवावे आणि हेअर वॉटर म्हणून वापरावे. • मेहंदी कालवताना ताक जास्वंद तेल आणि मेहंदी पावडर एकत्र भिजवावी हे मिश्रण लावल्यामुळे केसांना नैसर्गिक रंग येतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.