पोटाचा सुटलेला घेर नष्ट करा असे.! वजन कमी होतच जाईल.! आयुष्यात एकदा नक्की वापरून पहा हा उपाय.!

आरोग्य

पोटाचा वाढलेला घेरा कोणालाच आवडत नाही मात्र आज कालच्या धावत्या जीवनशैलीत प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो. सोबतच बाहेरचं अरबट सरबट व तिखट व तेलकट पदार्थ खावून आपले पाचन तंत्र साफ बिघडते. रोज आम्ल पित्त शरीरात वाढू लागते. सकाळी पोट देखील साफ होत नाही. मात्र या सर्व समस्यांवर आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी या सर्व व्याधींवर एकच रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.

हा एक नैसर्गिक व साधा सोपा उपाय आहे मात्र याच्या गुणधर्मामुळे तुम्हाला 100% फायदा जाणवू लागेल. चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक आहे ओवा. ओवा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे ज्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. ओवा चवीला तिखट, कडवट आणि आंबट असतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते.

शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते.ओव्याचा सर्वात मोठा महत्त्वाचा फायदा म्हणजे ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते. याचं कारण ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकात ओव्याचा वापर करा. जेवणानंतर ओव्या मुखवास खाण्याने तुमच्या पचनक्रियेमध्ये हळूहळू सुधार होऊ शकतो.

दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे जीरे. जिरे आपल्या रोग प्रतिकारशक्तीला वाढवते. त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. जिर्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचत. त्वचेसाठी देखील जीर्याचे सेवन खूपच फायदेशीर मानले जाते. तसेच केसांसाठी ही आहेत. केसांसाठी बाजारात जिऱ्याचाच वेगळा प्रकार असलेलं काळ जिरं मिळतं. या जिऱ्याचं तेल केसांना लावल्यास केस गळणं कमी होते.

हे वाचा:   तुम्ही तुमच्या फ्रिज मध्ये चिकन किती दिवस साठवून ठेऊ शकता.? काय आहे चिकन साठवून ठेवायचा चांगला मार्ग.!

तापामुळे जेव्हा शरीर दूखू लागते तेव्हाच आपल्याला अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्यासोबत गूळ मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल थंडीच्या दिवसात नाक बंद होण्याची समस्या खूप सामान्य आहे. पण काही जणांना हा त्रास बरेच दिवस होत असतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या.

मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका येणं बंद होईल. तीसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी आवश्यक आहे ते म्हणजे आले. होय मित्रांनो आले हा एक शक्ती वर्धक घटक आहे. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील आल्याचे सेवन लोक आवर्जून करतात. डोकेदुखी, सर्दी, खोकला तसेच घश्याचे आजार या सर्वांवर देखील आल्याचे सेवन हा एक रामबाण उपाय आहे.

हे वाचा:   असे वरण खूप चवदार बनते.? वरणात ही वस्तू खूपच थोडी टाकावी.! खतरनाक वरण बनेल.!

आल्याला चहातून सुद्धा लोक पितात या मागचे कारण म्हणजे यामुळे झोप उडते व चांगली तरतरी येवू लागते. मेंदू जागृक होतो व कामात लक्ष्य लागते. आता 100 ग्राम ओवा व जीरे घ्या आणि पाण्यात टाकून हे भांडे गरम होण्यासाठी गॅसवर ठेवा. आता एक उकळी आली की गॅस बंद करा. आत पुढे यात आले बारीक करुन घाला व पाणी चांगले उकळण्याची प्रतिक्षा करा. पाण्याला कड आल्यावर गॅस बंद करा.

आता हे पाणी गाळून घ्या. हे पाणी आता असेच गरम गरम पिवू नये. थोडा वेळ थंड झाल्यावर प्यावे. ज्या वेळी तुम्ही चहा घेता या वेळी ही वेगळी चहा घ्या. याच्या नियमित सेवनाने तुमच्या पोटा संबंधीत सर्व समस्या दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.