खोकला वाढतच चालला का? मग आत्ताच करा हा उपाय.! खोकला झटपट बंद.! सर्दी, खोकला, कफ होईल बरा.!

आरोग्य

मित्रांनो आजकालच्या बदलत्या वातावरणामध्ये सर्दी खोकला कफ होणे ही काही मोठी बाब नाही. आपण अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी देखील डॉक्टरकडे धाव घेतो आणि ऍलोपथी औषध गोळ्या सुरू करतो. प्राथमिक स्वरुपात आपल्याला बरे वाटते देखील परंतु पुढे होणाऱ्या दीर्घ दुष्परिणामांचा आपण अजिबात विचार करत नाही. सर्दी खोकला यांसारखे आजार अतिसामान्य आहेत.

यावर काही आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय केलेले अधिक चांगले. यामुळे तुमच्या शरीराला कोणतीही हानी होत नाही. अनेकदा सर्दी खोकला मुळे आपल्याला श्वास घेणे देखील कठीण होऊन जाते अशा वेळी आपण गरम पाण्याची वाफ घ्यावी. सर्वात आधी महत्त्वाचे काम करायचे ते म्हणजे कोमट पाणी पिणे सुरू करणे. आणि गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ लवकर बाहेर पडतो याशिवाय श्वासोच्छवास करताना येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात.

परंतु वाफ घेणे हे रोज रोज शक्य नसते आणि आपल्या त्वचेच्या दृष्टीने आपल्या चेहऱ्याला देखील हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळाच वाफ घ्यावी अन्यथा चेहऱ्यावर दुष्परिणाम दिसू लागतील. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हे आपल्यापैकी अनेक जण करतच असतील. यामुळे देशातील जंतू नष्ट होऊन श्वसन नलिका मोकळी होते.

हे वाचा:   या वनस्पतीचे फक्त दोन पाने खा, शंभर वर्ष एकदाही आजारी पडणार नाही.!

कप खोकला देखील कमी होण्यास मदत होते. सर्दी कफ खोकला झाले असता कोमट दुधामध्ये दोन चिमूट हळद व एक छोटा गुळाचा खडा घालून रात्री झोपताना असे दूध प्यावे. खूप फरक पडतो. भयंकर खूप खोकला असल्यास त्यामध्ये ज्येष्ठमधाची पावडर देखील तुम्ही खाऊ शकता. ज्येष्ठमध चावून चघळु शकता. दैनंदिन पेय म्हणजे चहा यामध्ये आल्याचा तुकडा गवतीचहा लिंबाचे पाने घालून असा चहा प्या.

तुम्हाला लवकर फरक जाणवेल. कोरडा खोकला असल्यास त्यामध्ये मधाचे सेवन करणे हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. यामुळे घशातील खवखव कमी होते. सर्दी खोकला कफ याचे लक्षणे दिसू लागताच काही पथ्य पाळावीत जसे बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ सेवन करू नयेत. याशिवाय घरात आंबट तेलकट असे पदार्थ टाळावेत. सोबत नेहमी हातरुमाल बाळगावा व यावर निलगिरी तेल ओता.

अधून मधून श्वास घेताना हे निलगिरीचे तेलाचा वास घ्यावा. यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होईल. दोन चिमूट भीमसेन कापुराची पावडर एक चमचा मधासोबत दिवस आणि रात्री चाटण केल्याने देखील खोकला त्वरित कमी होतो. खोकला मध्ये आले पाकाचे सेवन केल्याने देखील भरपूर लाभ मिळतो. २० ग्रॅम गहू घ्या. २० ग्रॅम सैंधव मीठ घ्या. गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

हे वाचा:   काळे मनुके सकाळी सेवन केल्याने काय होईल.? कोणते मनुके खाण्यास असतात सर्वात उत्तम.! आरोग्य कशाने होत असते उत्तम.?

यानंतर एक भांड्यात २५०ml पाणी घेऊन गरम करा. यात धुतलेले गहू घाला. ते १२-१५ मिनिटं शिजवा. यात सैंधव मीठ घाला. पाणी अर्ध होई पर्यंत उकळवा. गॅस बंद करुन गाळणी च्या मदतीने पाणी काढून घ्या. हे पाणी असच गरम चार ते पाच चमचे घ्यावे. राहिलेले पाणी पूर्ण दिवसांमध्ये चार पाच चमचे करून संपवून टाकावे. दरवेश पिताना हे पाणी गरम असावे या उपायांमुळे तुमचे सर्दी खोकला कफ होतेल त्वरित नष्ट.. अवश्य करून बघा हे उपाय आणि टिप्स.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *