मित्रांनो आजकाल अकाली केस पिकण्याची समस्या सर्वत्र बघायला मिळत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. शरीरात पोषक घटकांची कमतरता, अनुवंशिकता, रासायनिक उत्पादनांचा बेसुमार वापर, ब्युटी पार्लर मध्ये केले जाणारे वेगवेगळे ट्रीटमेंटस, वाढते प्रदूषण, स्वच्छतेचा अभाव यामधील ही काही प्रमुख कारणे होत. तसे तर वयोमानानुसार के सभी करणे ही सामाजिक बाब आहे परंतु कमी वयामध्ये होणारे पांढरे केस एक मोठी चिंता बनून तुमच्या सौंदर्यात बाधा आणते.
तुम्ही उगीचच कमी वयामध्ये प्रौढ दिसू लागता. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास घरगुती उपाय. ज्यामुळे तुम्ही एका रात्रीत तुमचे केस सुंदर काळेभोर मऊसूत बनवू शकता. मित्रांनो आज काल सगळ्यांनाच वाटते की आपले केस लांब काळेभोर आणि सुंदर मऊ असावेत. केसांना फॅशनेबल स्टायलिश रंग ही असावा. परंतु या नादात आपण अनेक रासायनिक पदार्थ वापरून केसांचे अजूनच नुकसान करतो.
त्याला हा नैसर्गिक घरगुती उपाय पर्याय आहे. आपल्या केसांना नैसर्गिक बर्गंडी कलर देण्यासाठी या उपायामध्ये आपण वापरणार आहोत बीटरूट. फक्त रंगच नव्हे तर बीटरूट आपल्या केसांना देईल अनेक पोषक तत्वे. याशिवाय बीट तुमच्या केसांना नैसर्गिक कंडिशनर देण्याचे काम देखील करेल. बीटामध्ये लोह, प्रथिन, विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपली केस गळतीची समस्या देखील दूर होते.
तसेच आपल्या डोक्याचे स्काल्प देखील हेल्दी राहते. केसांमध्ये कोंडा देखील होत नाही. तसेच बिटाचा रस केसांच्या मुळाशी लावल्याने केस होतील मजबूत. अशाप्रकारे तुमचे केस होतील दाट. बीटा मुळे नैसर्गिक येणारा रंग तुमच्या केसांना अजूनच सुंदर बनवतो. तेव्हा एका मध्यम आकाराच्या बीटाचे साल काढून बारीक काप करून घ्या. यामध्ये थोडेसे पाणी घालून मिक्सरवर वाटून घ्या.
पंधरा दिवसातून एकदा अशाप्रकारे जर तुम्ही केसांना हेअर मास्क लावल्यास तुमचे केस अतिशय सुंदर होतील. तुमच्या केसांचा पोत देखील सुधारेल. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. त्यात एक वाटी पाणी घाला. त्यामध्ये आपल्याला घालायची आहे तीन चमचे नेस कॉफी. कॉफी मुळे आपल्या केसांमध्ये गुंता होत नाही यासोबतच केसगळती देखील थांबते. केसांच्या मुळाशी असलेले रक्तप्रवाह सुधारते.
सफेद केसांसाठी कॉफी अत्यंत फायदेशीर आहे. हे मिश्रण एका चमच्याने एकजीव करा. हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर उकळायला ठेवा. उकळून झाल्यावर गॅस बंद करा. याच पाण्याच्या मदतीने आपल्याला हेयर मास्क बनवायचा आहे. यानंतर तुमचे केस ज्या प्रमाणात लांब मोठे छोटे असतील त्या प्रमाणात कोणतेही हरबल हिना किंवा मेहंदी पावडर घ्या. या उपायामुळे तुमच्या केसांची निगडित सर्व समस्या होतील दूर.
मेहंदी केसांना कंडिशनर करण्यासाठी देखील लावली जाते. यामध्ये आपल्याला बीटाचे व कॉफीचे पाणी असलेले मिश्रण घालायचे आहे. अशा प्रकारे मेहंदी रात्री भिजवा. सकाळी उठल्यावर ब्रश किंवा हाताने पूर्ण केसांना व मुळाना लावा. या उपायाचा आणखी एक फायदा म्हणजे तुमच्या केसांना फाटे फुटणे याची समस्या असल्यास ते देखील होईल गायब. कमीत कमी 45 मिनिटासाठी हे केसांवर असू द्यावे. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवावेत.
दुसऱ्या दिवशी हरबल शाम्पूने केस धुवावेत. पंधरा दिवसानंतर हा उपाय परत करावा. तुमचे केस होतील आता अतिशय सुंदर आणि स्टायलिश!! उपाय आवडल्यास तुम्ही करून आपल्या मित्रांना देखील शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.