किचन मध्ये ही कामे गृहिणी साठी वरदान ठरेल.! किचन मध्ये ह्या टीप्स वापरा आणि स्मार्ट व्हा.!

आरोग्य

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या दैनंदिन जीवनातील कामं सहजपणे होण्यासाठी काही सोप्या टीप्स. या छोटा सोप्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करून तुमचे जीवन सोपे सुकर करू शकता. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या सोप्या ट्रिक्स…

१. आपण घरामध्ये नेहमीच कांदा कापतो. ज्यांना सवय झाली असते त्यांना काही वाटत नाही परंतु नवीन कांदा कापत असलेल्या व्यक्तींना डोळे खूप पाणवल्याचे जाणवते. त्यासाठीची आहे टही ट्रिक. कांदा घेऊन त्या मध्ये मागील बाजूने काटा चमचा अडकवा आणि मुळाच्या भागाने गॅस वर काही मिनिटं धरा. यानंतर हा कांदा कापा. आता तुमच्या डोळ्यातून कधीच पाणी येणार नाही.

२. थंडीमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यन्त चांगले मानले जाते. नेहमी देखील साखरे ऐवजी आपल्याला गुळाचा वापर केला पाहिजे. परंतु कोणता गोळा घ्यावा हे आपल्याला ठाऊक नसते. वर्षानुवर्षे गूळ खराब होऊ नये याकरता कसा साठवावा? गूळ नीट न ठेवल्याने त्यामध्ये आद्रता होऊन गुळ खराब होतो. कधीही लाईट रंगाचा गूळ खरेदी करू नये. नैसर्गिक गुळाचा डार्क रंग असतो. लाईट रंग येण्यासाठी ते लोक बनवताना यात व्हाईट रंगकार्ट रसायन घालतात.

हे वाचा:   सर्व महागडी औषधे आहेत याच्यासमोर फेल, रोज एक चमचा सकाळी खाल्ल्यानंतर कधीही येणार नाही म्हातारपण...!

बाजारातून गुळ आणल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन लवंग घालून पेपरमध्ये गुंडाळून ठेवावा. आणि हवाबंद डब्यात मध्ये ठेवून द्या. तुमचा असा गूळ वर्षानुवर्ष चांगला टिकेल. ३. घरात अनेक वेळा आपल्याला काही न काही बनवण्यासाठी नारळाचा उपयोग करावा लागतो. नारळ फोडण्यासाठी खूप मेहनत लागते. पाहुयात सोपा उपाय. एका लांब भांड्यामध्ये पाणी घेऊन गरम करा. यामध्ये नारळ काही वेळासाठी ठेवावा.

अगदी अननसा प्रमाणे तुम्ही नारळाचे सालं सुरीने कापून शकाल. तुमचे काम सोपं होईल. आता नारळ सहज फोडण्यासाठी गॅस वरती थोडा वेळ ठेवा. अगदी कमी मेहनतीत तुमचा नारळ सहज फुटेल. आणि करवंटी पासून सुद्धा सहज वेगळा होईल. ४. उरलेला ओला नारळ फ्रिज मध्ये ठेवला असता त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. परंतु असा हा नारळ जर तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवला तर तो एक महिन्यापर्यंत तुम्ही नीट साठवू शकता. शक्यतो आठवड्याभरातच नारळ फोडल्यावर वापरावा.

हे वाचा:   चिकन-मटण न खाणाऱ्या लोकांसाठी आहे हे सर्वात चांगले प्रोटीनचे मार्ग, चिकन, मटन, मासे यापेक्षा जास्त प्रोटीन असते या काही पदार्थात.!

५. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मटार भरपूर प्रमाणात येतो. आपल्याला देखील मटार आवडतात, प्रत्येक भाजी मध्ये मटार टाकला असता देखील छान चव येते, असे हे मटार मोठ्या प्रमाणात सोलायचे असेल तर काय करावे? एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये एक किलो मटाराच्या शेंगा घालाव्यात. झाकण ठेवून गॅस बंद करा. मटार उकळू नका. पाणी काढून घ्या. सहज सालं निघतील. असं केल्याने मटार चा रंग हिरवा गार राहील.

त्याशिवाय कितीही दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांना कोंब फुटणार नाहीत. एका भांड्यामध्ये असे मटार सोलून त्यावर प्लास्टिकने रॅप करून फ्रिज मध्ये व्यवस्थित ठेवून द्या. आशा आहे या सोप्या ट्रिक्स चा तुम्हाला फायदा होईल आणि तुमची कामं सोपी बनतील. ही माहिती तुम्ही तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *