सध्या अत्यंत कडक असा उन्हाळा सुरू आहे. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपल्या परसबागेत तसेच अंगणात काही झाडे असतात त्याची देखील काळजी घ्यावी लागते. प्रत्येकाच्या घरासमोर असणारी तुळस देखील अनेकदा सुकली जाते. अशा वेळी नेमके काय करायचे ते आपण बघुया.
हिंदू धर्मामध्ये तुळशीला किती महत्त्व आहे हे सांगण्याची गरज नाही. हिंदू धर्मातील प्रत्येक घरासमोर तुळशी चे एखादे छोटेसे रोपटे हे लावलेले असते. परंतु काही वेळा तुळशीचे रोपटे वाढत नसते. अशा वेळी नेमके आपण काय करायला हवे हे आपल्याला सुचत नाही. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला तुळशीचे रोपटे कशाप्रकारे वाढवायचे हे सांगणार आहोत. हे काही उपाय केल्याने तुमचे तुळशीचे रोपटे हिरवेगार दिसेल.
जेव्हाही तुम्ही तुळशीचे झाड लावता तेव्हा लक्षात ठेवा की माती आणि पाण्याचे प्रमाण योग्य आहे की नाही. भांड्या मध्ये 70% माती आणि 30% वाळू मिसळा आणि त्यात तुळशीचे रोप घाला. यामुळे झाडाच्या मुळामध्ये जास्त पाणी अडकणार नाही आणि वनस्पती सडनार नाही आणि बराच काळ हिरवी राहील.
गायीचे शेण ज्याला आपण ‘शेणखत’ म्हणतो त्याला खत म्हणून वापरा. त्याची चांगली पावडर बनवून ती पावडर जमिनीत टाका. हे नैसर्गिक खत म्हणून काम करेल. यामुळे तुळशीची खूपच चांगल्या प्रकारे वाढ होईल. तसेच यामुळे तुळशीचे झाड हे हिरवेगार दिसेल. यासाठी वापरत असलेले भांडे हे नेहमी थोडे खोल आणि रुंद असावे.
तळाशी दोन मोठी छिद्रेही असावीत. भांड्याच्या तळाशी तण ठेवा, त्यावर कंपोस्ट माती मिसळा आणि नंतर त्यात तुळशीचे रोप लावा. एक लिटर पाण्यात फक्त एक चमचे Gypsum Salt मिसळा आणि झाडाच्या पानांवर आणि मातीवर शिंपडा. यामुळे वनस्पती पूर्णपणे हिरवी राहील.
नवीन लावलेल्या तुळशीच्या झाडाला जास्त पाणी घालू नका. पावसाळ्यात 4 ते 5 दिवसातून केवळ एकदाच पाणी घालावे. कारण मुळांमध्ये पाणी साचल्याने ही झाडे सडत असतात. एकदा तुळशीचे झाड लावले की त्याची सर्वात वरची पाने तोडा जेणेकरून वनस्पती केवळ वरूनच नाही तर इतर पानांपासूनही वाढेल.
तुळशीच्या वरती बीया येतात त्याला मंजुळा असे म्हंटले जाते. या मंजुळा म्हणजेच तुळशी च्या बीया वनस्पतीमध्ये येऊ लागली असेल तर ती काढून टाका. वाळलेल्या मंजुळा काढल्याने झाडाचे आयुष्य वाढत असते. जर तुळसच्या रोपामध्ये कीटक येत असतील तर त्यावर निंबोळी तेलाची फवारणी करावी. असे केल्याने सर्व किडे निघून जातील.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.