पावसाळा किंवा उन्हाळा या ऋतूमध्ये जास्तीत जास्त आपल्या त्वचेचे रोग झालेले आढळून येतात. खाज येणे, खरुज, डाग येणे किंवा अनेक त्वचेचे रोग हे सर्व रोग आजच्या आपल्या घरगुती उपाय यामुळे कायमचे दूर होणार आहेत. या सर्व त्वचेच्या रोगांना जर आपण दुर्लक्ष केले तर या छोट्या रोगाचे रूपांतर मोठमोठ्या त्वचेच्या रोगांमध्ये होऊ शकते. म्हणूनच आजचा उपाय खूप जास्त उपयुक्त असणार आहे.
आजचा आपला घरगुती जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते घरात सहज उपलब्ध होतात. हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत देखील घ्यावी लागणार नाही. चला तर जाणून घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला येथे कारले घ्यायचे आहे. हे कारले कोणत्याही प्रकारचे घेऊ शकतो जसे की जाड, बारीक कोणताही प्रकार इथे आपल्याला चालणार आहे.
त्यामुळे या उपायांमध्ये आपल्याला इथे एक कारले घ्यायचे आहे. पण त्याचबरोबर आपण तेही जाणून घेणार आहोत की या कारल्याचा उपयोग आपण कसा आणि कोणकोणत्या लोकांवर करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला कारले स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. त्यामुळे बाहेरचे कारल्याला लागलेले किटाणू, धूळ, माती सर्व निघून जाईल. त्यानंतर या कारल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत.
आपल्याला या कारल्याची साले काढायची गरज नाही आहे. कारण या उपायांमध्ये कारल्याची साल हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या कारल्याचे तुकडे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ज्या व्यक्तींना अंगावर जास्त प्रमाणामध्ये खाज सुटत असेल. तर त्यांनी पुढील प्रमाणे उपाय करायचा आहे.
आपल्याला इथे तीन ते चार वड्या कापूर घ्यायचा आहे. त्यानंतर या कापराची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा नारळाचे तेल टाकायचे आहे. अश्या प्रकारे हे मिश्रण तयार केल्यास आपल्या केसांमध्ये कोंडा असेल तर तो ही निघून जातो. आपल्या अंगावर कुठे कीटाणु असतील ते ही मरून जातात.
कुठेही खाज, डाग किंवा खरूज असेल त्याला देखील आपण हे लावू शकतो आणि जर खूप जास्त खाज असेल तर ह्या तेलामध्ये आपण त्या कारल्याची पेस्ट टाकून ती पेस्ट आपल्याला लावायची आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या खाज आलेल्या जागेवर लावल्यास तुम्हाला थंड वाटेल आणि खुप लवकर आराम मिळेल. ही पेस्ट अंगाला लावल्यानंतर पूर्ण रात्र ठेवायची गरज नाही.
जास्तीत जास्त अर्धा ते एक तास आपण या पेस्टला आपल्या त्वचेवर राहू द्यायचे आहे त्यानंतर ही पेस्ट धुवून टाकायची आहे. जर फक्त तुम्ही तेल आणि कापूर लावणार असाल तर ते मात्र तुम्ही पूर्ण रात्र तुमच्या शरीरावर ठेवू शकता त्यामुळे त्वचेला काहीच हानी होणार नाही. कारल्यामुळे त्वचेमध्ये असलेली खास शरीरात अभावामुळे आलेले डाग असे सर्व रोग कारल्याचा वापर केल्याने निघून जातात.
आणि कापूर हा आयुर्वेदात महत्त्वाचा घटक असल्यामुळे तोही आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी एक घटक आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.