उन्हाळा हा ऋतू अत्यंत गर्मीचा ऋतू म्हणून मानला जातो. हे तर सर्वांना माहीतच आहे परंतु, उन्हाळ्यामध्ये शरीराची खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. आपण आपली शारीरिक काळजी ही स्वतः घ्यायला हवी. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत. या माहीतीने तुम्हाला भरपूर फायदा होईल तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.
उन्हाळ्यात सगळ्यांनाच खूप तहान लागते. नेहमीच थंड प्यावस वाटत. उन्हाळ्यात, बहुतेक लोकांना फ्रीजमधून थंड पाणी पिण्यास आवडते. पण हे पाणी घटक सुद्धा असू शकते. तसंच, कूलर किंवा एसी मध्ये खुप वेळ बसल्यावर लगेच उन्हात बाहेर गेल्याने किंवा उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिल्याने उन्हाळी लागू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांना, लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना उन्हाळी लागण्याचे प्रमाण जास्त असते.
पण पूर्वी फ्रीज नव्हते तेव्हा लोक मातीच्या माठातले पाणी पीत होते, तसेच हे आरोग्याच्या दृष्टीने. फायदेशीर होते. माठातल्या नैसर्गिकरित्या थंड झालेल्या पाण्याची गोडी वेगळीच. गावच्या ठिकाणी आजही मातीच्या भांड्यात केलेल्या मांस-मटणाला तसेच विविध पदार्थांना खास महत्व आहे.
आजच्या काळात या भांडयातील पाणी पिण्याचे लोक कमी झाले आहेत, परंतु आपणास हे माहित आहे का की हे भांडे पाणी पिण्यासाठी आपल्या शरीराला फायदेशीर आहे. मातीमध्ये अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्याची क्षमता असते. जेव्हा आपण या मातीच्या भांड्यातून पाणी पितो तेव्हा आपल्या शरीराला बरेच फायदे मिळतात.
मातीच्या सछीद्र भांड्यातून झिरपत बाहेर आलेल्या पाण्याच्या थेंबांच्या बाष्पीभवनासाठी या भांड्यातील पाण्यातून उर्जा घेतली जाते. त्यामुळे भांड्यातील पाणी थंड होत जाते. पाणी थंड होणे हे बाष्पीभवनावर अवलंबून असते. जेवढे बाष्पीभवन जास्त होते तितके पाणी जास्त थंड होते. म्हणूनच माठाच्या तळाला पाणी सतत झिरपत असते. बाष्पीभवनासाठी माठ सर्व उष्णता आपल्याकडे खेचून घेतो आणि अगदी नैसर्गिकरित्या पाणी थंड होते.
नैसर्गिकरित्या थंड झालेले मातीच्या माठातील पाणी चांगल्या पद्धतीने आणि ब-याच काळासाठी तुमच्या शरीराला थंडावा देण्यास समर्थ असते. तसेच मातीचा सुगंध , सगळ्यांनाच आवडतो. आणि माठातील पाणी पिल्याने मन शांत होते. आणि उन्हाळ्यात पाणी प्यायल्या सारखे वाटते. पिण्यायोग्य पाणी पिल्याने नियमितपणे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे आपण त्वरीत आजारी पडत नाही आणि दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता.
पिण्यायोग्य पाणी पिण्यामुळे आपली पचन क्रिया देखील मजबूत होते, निरोगी शरीरासाठी चांगली पचन प्रणाली असणे फार महत्वाचे आहे. पिण्यायोग्य पाणी पिण्यामुळे तुमचे वजन संतुलितही राहते. म्हणून, आपण माठाच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. तुम्ही मातीच्या माठात साठवलेले पाणी नियमित न चुकता सेवन केले तर शरीरातील नको असलेली घाण अगदी सहजरित्या बाहेर निघून जाते.
मातीच्या माठात साठवून ठेवलेले पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा हा पोटाला होतो. हे पाणी पोटाशी निगडीत अनेक गंभीर आजारांना म्हणजेच बद्धकोष्ठता, पित्त, पोटात पडलेले मुरड दूर करण्यासाठी हे पितात. जेव्हा आपण फ्रीजमधले जास्त थंड पाणी पिता तेव्हा घश्याच्या आजाराची शक्यता वाढते. जर आपल्याला घश्याचे आजार टाळायचे असतील तर आपण माठातील पाणी घेणे आवश्यक आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.