आपल्या परसबागेमध्ये आपण अनेक अशी झाडे लावतो. जी दिवसेंदिवस वाढत असतात आणि त्या त्या प्रकारची झाडे फळे आपल्याला देत असतात. मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, त्याबरोबरच लिंबाचे झाड इत्यादी झाडांची आपण लागवड करत असतो पण आपल्यापैकी अनेक जणांच्या झाडाला कमी प्रमाणत लिंबे लागतात.अनेकवेळा झाडांना लिंबू देखील लागत नाही. या लिंबाच्या झाडाची वाढ होत नाही.
म्हणूनच आज आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यामुळे लिंबाचे झाड आपोआप वाढण्यास मदत होईल सोबतच भरपूर प्रमाणात लिंबे देखिल लागतील. चला तर मग जाणून घेऊया ही प्रक्रिया करण्यासाठी काय काय करावे लागेल. सर्वप्रथम ज्या लिंबाच्या झाडाची वाढ झालेली आहे पण त्यावर फळ येत नाही आहे. अशा झाडाच्या कुंडी मध्ये एक दिवस पाणी देणे बंद करावे जेणेकरून चा कुंडीतली माती सुकेल व आपल्याला पुढील प्रक्रिया करण्यास मदत होईल.
त्याच बरोबर वाढ झालेल्या लिंबाच्या झाडाचे नवीन पालवी फुटलेले ब्रांच म्हणजेच जिथे नवीन पालवी फुटलेली असते ती पाने आपल्याला कापून टाकायचे आहे जेणेकरून झाडाची ग्रोथ थांबेल व नवीन फुले आणि पाने यायला मदत होईल. त्यानंतर आपल्याला कुंडीतील माती थोड्या जास्त प्रमाणात खुरपून काढायची आहे म्हणजेच हलक्या हाताने वर वर खोदून काढायची आहे त्यामुळे आपण जो उपाय करणार आहोत.
तो झाडाच्या मुळापर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे तीन ते चार इंच आत मध्ये आपल्याला ही माती खोदायची आहे. त्यानंतर जेवढी माती आपण खोदली आहे ती सर्व माती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. खोदल्यानंतर आपल्याला छोटी छोटी मुळे दिसतील ती मुळे देखील आपल्याला काढायची आहेत. कधी कधी त्या छोट्या छोट्या मुळांमुळे देखील झाडावर फळ टिकत नाही त्यामुळे आपल्याला मुळे काढून घ्यायचे आहेत.
आता आपण जाणून घेऊया प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे खत घ्यायचे आहे. हे खत शेण असेल तरी देखील चालू शकते किंवा कोणत्याही प्रकारचे खत आपल्याला इथे वापरायचे आहे. फक्त आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करायचा नाही आहे. शेनाचे खत टाकून झाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी द्यायचे आहे त्यानंतर थोडा वेळ वाट पहायची आहे जोपर्यंत हे पाणी त्या खतांमध्ये व झाडांमध्ये मुरत नाही.
त्यानंतर तिथे आपल्याला एक चमचा जाडे मीठ घ्यायचे आहे. हे मीठ आपल्याला ऑनलाइन किंवा कोणत्याही दुकानांमध्ये सहजपणे आढळू शकते. हे मीठ फक्त टाकलेल्या खतावर फवारून घ्यायचे आहे. या मिठामध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते त्यामुळे झाडावर लवकर फळ येण्यास मदत होते. त्यामुळे फक्त या मिठाची फवारणी करून घ्यायची आहे. त्यानंतर जी माती आपण काढून ठेवलेली होती ती माती साफ करून आपल्याला परत वापरायची आहे.
त्यामुळे मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला माती टाकायची आहे. माती टाकून झाल्यावर त्यावर परत एकदा भरपूर पाणी टाकायचे आहे. त्यानंतर एका स्प्रे बॉटल मध्ये किंवा जर तुमच्याकडे स्पेअर असेल तर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक ते दोन चमचे जाड मीठ टाकायचे आहे आणि या पाण्याने महिन्यातून एक ते दोन वेळा लिंबाच्या झाडावर फवारणी करायची आहे हे मीठ फळ फुल लवकर येण्यासाठी मदत करेल.
ही फवारणी केल्यावर आणि आपण केलेल्या प्रक्रियेनंतर आपल्याला खरंच खूप चांगला अनुभव येईल म्हणजेच महिन्यामध्ये किंवा थोड्या दिवसांनी झाडावर फळ फुल यायला लागेल आणि तुमचे झाड पुर्वीसारखे बहरेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.