हल्ली सगळ्यांसमोर अति लठ्ठपणा आणि वाढलेले वजन ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. अति लठ्ठपणा म्हणजे शरीरावर अतिरिक्त चरबीचा थर जमा होणे. हा चरबीचा थर कमी करताना अनेकांच्या नाकी नऊ येत असतात. बहुतेकांच्या पोटाचा आकार वाढलेला असतो.जरी तुमच्या पोटाचा आकार वाढलेला नसेल तरी मांडीखालील व कमरेचा आजूबाजूचा अवयव हा चरबीने माखलेला असतो, अशावेळी जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपल्या डोक्यामध्ये सर्वात आधी विचार येतो तो म्हणजे डायट करण्याचा.
जिम करण्याचा, व्यायाम करण्याचा परंतु अनेक जण जेवण करण्यावर बंदी घालत असतात. डायट फॉलो करतात परंतु असे न करता जर तुम्ही तुमच्या जेवण करण्याच्या पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे असलेले फेरबदल केले तर तुमचा शरीरावर निर्माण झालेला अतिरिक्त चरबीचा थर अवश्य कमी होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अति लठ्ठपणा चा त्रास जाणवणार नाही.
आपण नेहमी आपल्या अन्नपदार्थांमध्ये व आहारामध्ये असे काही पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही खाल्लेले पदार्थ सहजरीत्या पचू शकतील त्यांचे रूपांतर उर्जेमध्ये होऊ शकेल आणि म्हणूनच कोणताही डायट बंद न करता डायट चालू असतानाच असे काही पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे ज्यामुळे तुमची पचन संस्था व्यवस्थित रित्या कार्य करू शकेल.
बहुतेक वेळा आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्याचे रूपांतर ऊर्जेत झाले नाही तर शरीरावर अतिरिक्त चरबी म्हणजेच फॅट निर्माण होऊ लागते आणि याच फॅटचे रूपांतर अतिलठ्ठपणा मध्ये होत असतो. आजच्या लेखामध्ये आपण असे एक ड्रिंक बनवणार आहोत, ज्या ड्रिंकच्या सेवनाने तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होणार आहे व त्याचबरोबर पोटावर चरबीचा थर देखील भविष्यात जमा होणार नाही, त्यासाठी आपल्याला जे काही पदार्थ लागणार आहेत ते तुमच्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात.
आजचा पहिला उपाय आपल्याला करण्यासाठी जे काही पदार्थ लागणार आहेत ते पदार्थ पुढील प्रमाणे आहेत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला भेंडी, काकडी, आले पाणी लागणार आहेत. भेंडी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर उपलब्ध असतात. जर तुम्हाला भेंडी सेवन करणे आवडत नसेल तर तुम्ही त्या भेंडी ऐवजी काकडीचा देखील वापर करू शकता. भेंडी मध्ये फायबर जास्त प्रमाणात उपलब्ध असल्याने तुमच्या शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत होतो त्याचबरोबर र’क्तामध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असतील तर ते देखील बाहेर पडण्यासाठी मदत होते.
भेंडीचे सेवन केल्याने आपली पोट नेहमी भरल्यासारखे राहते आणि म्हणूनच आपल्याला वारंवार भूक देखील लागत नाही. म्हणून जर तुम्हाला अवेळी खाण्याची सवय असेल तर ती सवय देखील हळूहळू कमी होऊन जाईल. भेंडी सेवनाने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते आणि म्हणूनच तुम्हाला भविष्यात कधीच थकल्यासारखे वाटणार नाही. स्त्री व पुरुष यांचे लैं’गि’क क्षमता वाढवण्यासाठी देखील भेंडीचे पाणी उपयोग ठरते.
भेंडीचे पाणी बनवण्यासाठी आपल्याला भेंडी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर भेंडीचे मधोमध तुकडे करायचे आहे आणि एका काचेच्या बरणीमध्ये भेंडी टाकून त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून ठेवायचे आहे. दुसरीकडे एका पातेल्यामध्ये आपल्याला एक ते दोन ग्लासभर पाणी टाकायचे आहे आणि ते पाणी उकळायला ठेवायचे आहे. या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले आले, बडीशेप, धने मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला उकळून रात्रभर भिजत ठेवायचे आहे.
सकाळी उठल्यावर भेंडीच्या पाण्यामध्ये हे सारे मिश्रण असलेले पाणी एकजीव करायचे आहे आणि आपल्याला नाष्टा करण्यापूर्वी म्हणजेच अर्धा ते एक तास पूर्वी हे पाणी सेवन करायचे आहे, अशा प्रकारे आपले नैसर्गिक रित्या तयार केलेले ड्रिंक तयार आहे. या ड्रिंक मुळे तुमच्या शरीरामध्ये साखर व मैद्यापासून निर्माण झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करते. तुमच्या शरीरामध्ये असलेला चरबीचा थर कमी होतोच पण त्याचबरोबर तुमच्या शरीरावर एक वेगळाच ग्लो निर्माण करण्यासाठी देखील हे ड्रिंक मदत करते.
या पाण्यामध्ये अँटिबायोटिक, अँटिऑक्सिडंट आणि आयरन यांचे प्रमाण जास्त असल्याने तुमच्या शरीराला खूप सारे औषधी घटक मिळत असतात आणि म्हणूनच तुमच्या शरीराला अंतर्गत सुरक्षा व बाहेरुन सुरक्षा प्रदान करण्याचे कार्य हे पाणी प्रदान करते. हे पाणी नियमितपणे सेवन केल्याने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते व भविष्यात तुम्हाला कोणतेही आजार होणार नाही याची गॅरंटी देखील हे पाणी तुम्हाला देते.
जर तुम्ही सातत्याने या ड्रिंकचे सात दिवस सेवन केले तर तुमच्या शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागेल आणि तुम्हाला पुढील सात दिवसांमध्ये शरीरात झालेले बदल देखील जाणवू लागतील आणि म्हणूनच कोणतेही डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधोपचार न करता घरच्या घरी देखील तुम्ही हे ड्रिंक तयार करू शकता आणि अतिरिक्त चरबीवर मात करू शकता.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.