पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला ची साथ का येते.? प्रत्येकाच्या घरात का आहे सर्दी पडसे चा रुग्ण.! अत्यंत महत्त्वाची माहिती.!

आरोग्य

सध्या पावसाळा हा ऋतू सुरू आहे आणि या ऋतू मध्ये आपण बघतो की सगळं हिरवे गार झालेले असते. पावसाळा ऋतू खूप सुंदर ऋतू मानला जातो परंतु या ऋतू मध्ये आजार देखील तितकेच वाढत जात असतात. या ऋतू मध्ये सर्दी होणे, ताप येणे, खोकला, थंडी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांचे थैमान आसते. परंतु असे का होते तसेच असे झाले तर काय करावे हे आपल्याला माहीत नसते.

आजच्या या लेखात आपण याबाबत माहिती बघणार आहोत. तर जेव्हा पण पावसाळा सुरू होतो तेव्हा उन हे गायबच होऊन जाते. उन नसल्यामुळे देखील शरीराला योग्य ते पोषण तत्वे मिळत नसतील या कारणाने देखील असे होऊ शकते. त्यामुळे जर कधी सकाळच्या वेळी उन पडले तर उन्हात नक्की जावे. अनेक वेळा आपल्या घरावर असे काही भांडी, भंगार ठेवलेले असते जे खरेतर आपल्याला काही उपयोगी पडत नाही.

यामध्ये अनेक वेळा पाणी साचले जाते आणि यात जंत होतात यामुळे मच्छर निर्माण होतात आणि व्हायरल इन्फेक्शन पसरवण्याचे सर्वात मोठे काम हे मच्छर करत असतात. त्यामुळे घरावर असे पाणी साचेल असे भांडी ठेवू नका. घरा जवळ तुंबलेले गटारे असतील किंवा असे काही ठिकाणे असतील ज्या ठिकाणी भरपूर पाणी साचते अशा ठिकाणी आपण एक ते दोन बुच पेट्रोल टाकावे. यामुळे त्या साचलेल्या पाण्यात असलेले किडे मारून जातील.

हे वाचा:   एक थेंब टाका आणि कानातला मळ झटपट बाहेर येईल.! कान एकदम मोकळा करायचा असेल तर हा उपाय केवळ तुमच्या साठी आहे.!

ताप किंवा सर्दी झाली तर आपण काही घरगुती उपाय करू शकता पण जर खूपच प्रमाणात असेल तर डॉक्टर कडे जाणेच तुमच्या साठी योग्य राहील. सर्दी झाली तर काय करावे असे तुमच्या डोक्यात सुद्धा आले असेलच की तर यासाठी शक्य होईल तितके गरम पाणी प्यावे. मध, लिंबू आणि वेलचीचे मिश्रण
अर्धा चमचा मधामध्ये चिमूटभर वेलची पावडर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. हे सरबत दिवसातून दोनदा सेवन करा.

सर्दी, खोकला यापासून खूप आराम मिळेल. शक्यतो गरम पाणी प्या. तुमच्या घशातील कफ उघडेल आणि तुम्हाला बरे वाटेल. लहानपणी हिवाळ्यात आजी घरातील मुलांना रोज हिवाळ्यात हळदीचे दूध द्यायची. हळदीचे दूध थंडीत खूप फायदेशीर आहे कारण हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्याला जंतूंपासून वाचवतात. रात्री झोपण्यापूर्वी ते प्यायल्याने लवकर आराम मिळतो. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात जे संक्रमणाविरुद्ध लढतात.

हे वाचा:   रोज रोज चिकन खाणाऱ्यानी एकदा हे वाचाच.!

त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म सर्दी, खोकला आणि सर्दीच्या लक्षणांमध्ये आराम देतात. कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून कुस्करल्याने खोकला आणि सर्दीमध्ये खूप आराम मिळतो. यामुळे घशाला आराम मिळतो आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो. ही पण खूप जुनी रेसिपी आहे. चहामध्ये आले, तुळस, काळी मिरी घालून चहा प्या. या तिन्ही घटकांच्या सेवनाने सर्दी-खोकलामध्ये खूप आराम मिळतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.