वाढलेल्या वजनाला असे कमी केले जाते.! ३६ ची कंबर २५ वर अशी येते.! स्त्रियां साठी खूप महत्वाची माहिती.!

आरोग्य

आम्ही तुमच्यासाठी नवनवीन आयुर्वेदिक उपाय आणत असतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक वजन कमी करण्याचा उपाय घेऊन आलो आहोत. बऱ्याच लोकांना तक्रार असते की, उपायासाठी लागणाऱ्या वस्तू या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. म्हणून तुम्हाला ते उपाय करता येत नाहीत. आणि म्हणूनच आम्ही आजच्या उपायामध्ये अशा घटकांचा वापर करणार आहोत की ज्या तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतील.

आजची माहितीत आपण सविस्तर बघणार आहोत हे पेय कसे बनवायचे? कसे सेवन करायचे? कधी करायचे आणि काय काळजी घ्यायची? नेहमी प्रमाणे तुमची तक्रार असते हा उपाय करायला वेळ लागतो, रोज बनवावे लागते. तुमचं काम आता सोपं होणार आहे हे तुम्ही साठवून ठेवू शकता. आपल्या भारतात चार करोड पेक्षा जास्त लोक वाढत्या वजनाने त्रस्त आहेत.

अनियमित जीवन शैली, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, गोड खाणे, अवेळी झोप, दारू तंबाखू यांचे सेवन अशी एक ना अनेक कारणे आहेत. योगासन, डायट, जिम, व्यायाम, झुम्बा, एरोबिक्स असे खूप प्रकार आपण ट्राय करतो. पण वजन काही केल्या कमी होत नाही. घरात सहज उपलब्ध होणारे कोथंबीर, आलं आणि लिंबू तीन घटकांपासून हा उपाय आपण करणार आहोत. 1 इंच आलं, 2 मध्यम लिंबू, 50 ग्रॅम कोथंबीर घ्या.

यासाठी आपल्याला मिक्सर लागणार आहे. 50ग्रॅम कोथंबीर काड्या सहित स्वच्छ धुऊन घ्यावी. दोन लिंबाचा रस (साला सहित,बी काढून घ्या) घ्या. एक इंच आल्याचे तुकडे करून हे मिश्रण मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. आलं पाचक असल्याने मेटाबोलिजम रेट वाढ होऊन पोट साफ ठेवते. यात कॅल्शियम, आयोडीन, लोह आणि वेगवेगळे विटामिन भरपूर प्रमाणात असतात.

हे वाचा:   घशातला कफ पाच मिनीटात बाहेर पडेल.! घसा बरा करायला याहून सोपा उपाय मिळणार नाही.! आज नक्की वाचा खूप म्हणजे खूप उपयोगी पडेल.!

आलं भूक वाढवते. त्वचेसाठी सुद्धा आलं फायद्याचे आहे. हिरव्यागार कोथंबीरीत पोटॅशियम, कॅल्शियम, खनिजं, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी कोथंबीर खूप जास्त लाभदायक आहे. यातील घटक आपली पचन संस्था भक्कम करतात. यामुळे आपले कोलेस्ट्रॉल कमी होते. शरीरातील जास्त करून आजार हे पोटापासून सुरू होतात. त्या प्रकारे वाढते वजन हे पोटा पासूनच सुरु होते.

कोथांबिरी मुळे ऍसिडिटीमध्ये आराम मिळतो. डायबेटिस रोग्यांसाठी हे वरदानच..थायराइड असेलेली लोकं सुद्धा हा उपाय करू शकतात. Pcod वाले लोकसुद्धा याचा वापर करू शकतात. गर्भवती स्त्रियासुद्धा हा उपाय करू शकतात. लिंबू व्हिटॅमिन सी चा प्रचंड स्रोत आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारे लिंबूचे सेवन करून तुम्ही वजन कमी करू शकता.

आपल्याला माहित आहे म्हणूनच आपण या उपायात लिंबूचा वापर केला आहे. लिंबू हे डी-टॉक्सिन चे काम करते. म्हणजेच शरीरातील सर्व वाईट घटक बाहेर टाकते. जर शरीरामध्ये विषारी घटक राहीलच नाहीतर वजन कसे वाढेल? सोबतच आपले स्वास्थ्य चांगले राहील. घट्टपणा कमी करायचा आहे परंतु शरीर निरोगी ठेवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. याचे सेवन कसे करावे मिक्सर वर वाटलेली पेस्ट तुम्ही 5-6 दिवस साठवून फ्रिज मध्ये ठेवू शकता.

हे वाचा:   रात्री झोपताना असे दूध पिल्यास मिळतो खूप फायदा.! आजार तुमच्यापासून दूरच थांबतील.! थकवा कायमचा पळवून लावा.! असे दूध एकदा नक्की प्या.!

एक ग्लास कोमट पाणी घ्या. आणि एक चमचा आपण बनवलेली पेस्ट टाका. सोबतच एक चमचा शुद्ध मध (शुगर नसलेल्यानी) मिक्स करा. आपलं पेय तयार…! हे पेय सकाळी काहीही न खाता-पिता प्यायचे आहे. तसेच संध्याकाळी ही एकदा हे प्यायचे आहे. हे पिल्यानंतर मात्र दोन तास आपल्याला काहीही खायचे नाही. तुम्हाला ताजेतवाने वाटेल. होते पहिल्या दिवसापासूनच फरक जाणवेल. आणि आपल्या वजन झपाट्याने कमी होऊ लागेल.

हे पिल्यानंतर एक वेळ अशी येईल की दिवसातून साधारण दोन किलो वजन तुम्ही कमी करू शकता. त्यासोबतच रोज सूर्यनमस्कार करणे, गोड तेलकट खाणे टाळावे, वेळेत झोपावे ( पुरेशी झोप घेणे), फळ, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा. काकडी, गाजर, टोमॅटो, सालेड आहारात वाढवावे. या पेयासोबत अशा चहूबाजूने प्रयत्न केल्यास तुम्हाला फरक नक्की जाणवेल..!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.