खानपान योग्य नसेल तर सर्व काही होत असते. आपल्याला महिन्यातून एकदा का होईना परंतु पोटा संबंधीचा कोणता ना कोणता विकार हा निर्माण होतच असतो. त्यातील काही असे आजार असतात जे पोटासंबंधी च्या बाबतीत खूपच घातक असतात. तर काही असे आजार असतात जे खूपच त्रासदायक असतात. यापैकीच एक म्हणजे जुलाब लागणे. काही कारणांमुळे आपल्याला जुलाब लागले जातात.
यामुळे भयंकर असा त्रास होत असतो. जुलाब लागल्यानंतर शरीरामध्ये पाणी कमी पडू लागते तसेच शरीरामध्ये अशक्तपणा येऊ लागतो. अशा वेळी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जुलाब लागल्यानंतर घरगुती पद्धतीने आपण कशाप्रकारे उपाय करू शकतो हे सविस्तरपणे सांगणार आहोत. तुम्ही दिलेला उपाय नक्की करून बघा जेणेकरून तुम्हालाही या प्रकारच्या आजारापासून सुटका मिळेल.
ज्या लोकांना जुलाब लागले आहे अशा लोकांनी दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण यामुळे याचा त्रास हा आणखी वाढला जाऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ यावेळी न खाणेच उत्तम ठरेल. असे असले तरी दुधापासून बनवलेले दही हे आपल्या या समस्येसाठी खूपच उपयुक्त ठरेल. कारण यामध्ये असे अनेक रामबान घटक असतात जे जुलाब च्या समस्येवर उपयुक्त मानले जातात.
आपल्याला हा साधा सोपा उपाय करण्यासाठी काही घरगुती पदार्थ लागणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी भीमसेनी कापूर लागणार आहे. कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर हा मिळून जाईल. या कापूर चे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे सांगितले जातात.
अनेक लोक हा उपाय करण्यासाठी जो आपण देवपूजेसाठी कापूर वापरतो तो वापरतील परंतु असे करणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही हा उपाय करण्यासाठी भीमसेनी कापूरच वापरावा यामुळेच तुम्हाला फायदा होईल. हा कापूर सर्व प्रथम बारीक करून घ्यावा त्यानंतर एका पातेल्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घ्यावे. यामध्ये एक चिमूटभर मीठ टाकावे.
आपण यामध्ये अर्धा चमचा साखर सुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे तो भीमसेनी कापूर ची पूड. यामध्ये या कापूर ची पूड दोन चुटकी टाकायची आहे. एवढे मिश्रण आपल्या या उपायासाठी योग्य ठरेल. हे सर्व पाण्यामध्ये टाकून घ्यावे व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. ज्या व्यक्तीला जुलाब चा त्रास आहे अशा व्यक्तीला हे पाणी पिण्यास द्यावे यामुळे भरपूर असा फायदा होतो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.