त्वचा वर असलेली खाज खरुज तीन दिवसात बरी करा.! अशा या सोप्या उपायाने अनेक लोकांना या भयंकर विकरातून बाहेर काढले आहे.!

आरोग्य

सर्वात भयंकर विकार कुठला असेल तर तो विकार म्हणजे त्वचा विकार. आपल्याकडे त्वचेवर पुरळ, लाल मुरुम किंवा सुटणारी खाज अशी एखादी लक्षणे असल्यास ती नंतर तीव्र बनू शकतात आणि हळूहळू वाढतात. अशाच त्वचा रोगांमुळे अनेक जण खूप त्रस्त असतात. काहींना तर अगदी उठता बसताना सुद्धा खूप त्रास होत असतो. अशा आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम आणि औषधे उपलब्ध आहेत.

पण यामुळे तात्पुरता आराम मिळतो आणि काही दिवसांनी पुन्हा त्रास चालू होतो. असे त्वचाविकार झाल्याने आपले लक्ष विचलित होते. कोणत्याही कामात मन लागत नाही. तसेच काही त्वचाविकार असे असतात की ते एकाकडून दुसर्यांना होऊ शकतात, अशावेळी तर आपल्याला त्यांच्यापासून दूर राहावे लागते.

खूप काळजी सुद्धा घ्यावी लागते. आणि त्यात जर एखादे लहान मुलं घरात असेल तर खूपच काळजी घ्यावी लागते त्यांना जपावे लागते. म्हणूनच अगदी थोडी जरी खाज येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की घरच्या घरीच करून पहा. बुरशीजन्य खाज या उपायाने कायमची निघून जाईल.

हे वाचा:   सकाळी दोन इलायची खाऊन गरम पाणी पिले.! पुढे जे झाले ते वाचून थक्क व्हाल.! शरीरात झाले असे जबरदस्त बदल.!

या उपायांसाठी आपल्याला लागणार आहेत कच्ची केळी. काही लोक याची भाजी सुद्धा करतात. केळीची साल आपल्या त्वचेसाठी अतिशय गुणकारी असते. केळीची साल आपल्या चेहऱ्यावर चोळली तर आपली त्वचा चांगली होते आणि चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.

तसेच केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. म्हणूनच कच्चं केळ घेऊन त्याची साल काढून ती वाटून घ्यावी आणि त्याची बारीक पेस्ट तयार करावी. यात दही टाकावे. जर तुम्ही दोन चमचे केळीची पेस्ट घेत असाल तर दोन चमचे दही घ्या, दोन्हीही तुम्हाला समप्रमाणात घ्यावे लागेल.

तसेच त्यात चार पाच थेंब लिंबू रस टाकावा. ही पेस्ट एकत्र करून ज्या ठिकाणी तुम्हाला खाज येत असेल तेथे लावा. ही पेस्ट तुम्ही रात्रभर सुद्धा लावून ठेवू शकता. लिंबू असल्याने ते थोडेसे जळजळू शकते. पण थोड्याच वेळाने तुम्हाला थंड जाणवेल. दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचेवरील मृत पेशी काढून नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात.

हे वाचा:   वजन एखाद्या मेणबत्तीसारखे वीतलेळ, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करण्याची गरज नाही.!

तसंच यातील फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजे या घटकांमुळे त्वचा निरोगी राहते. म्हणून तुम्ही हा उपाय अगदी सहजपणे करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.