घशातला कफ पाच मिनीटात बाहेर पडेल.! घसा बरा करायला याहून सोपा उपाय मिळणार नाही.! आज नक्की वाचा खूप म्हणजे खूप उपयोगी पडेल.!

आरोग्य

आज-काल पावसाळी वातावरणामध्ये तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा थंड पाणी पिल्यामुळे घशा संबंधीचे विकार निर्माण होत असतात. त्याबरोबरच कोरडा खोकला किंवा कप युक्त खोकला आल्यावर देखील आपल्याला खूपच बैचेनी झाल्यासारखे वाटत असते. अशा वेळी नेमके काय करावे हे आपल्याला सुचत नाही. आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला एक खूपच रामबाण उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खोकला पासून नक्कीच सुटका मिळेल. त्या बरोबरच घसा दुखी देखील नाहीशी होईल. याबरोबरच याचे अनेक फायदे हे शरीराला आहे. हे कोणते आहेत व हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे हे आपण संपूर्ण सविस्तर रीत्या पाहूयात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही पदार्थांची आवश्यकता भासणार आहे हे पदार्थ सहजपणे आपल्या घरात आढळतात.

आपल्याला लागणारा पहिला पदार्थ आहे हळद. हळदी मध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म असतात आपल्याला हा उपाय करण्यासाठी थोडीशी हळद घ्यायची आहे. एका वाटीमध्ये पाऊण चमचा हळद घ्यायची आहे व त्यानंतर आपल्याला लागणारा दुसरा पदार्थ आहे सुंठ पावडर. सुंठ नसेल तर खोकला जात नसतो. हे तर सर्वांना माहीतच आहे सुंठ मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

हे वाचा:   आंघोळ झाली की चेहऱ्यावर चोळा, काळा पडलेला चेहरा होईल गोरा, असा उपाय कधी एकला नसेल.!

त्या वाटीमध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकावी. आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे काळी मिरी पावडर. काळीमिरी पावडर मध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे कफ युक्त खोकला बरा होत असतो. तर आपल्याला काळीमिरी पावडर लागणार आहे तुमच्याकडे जर काळीमिरी पावडर नसेल तर तुम्ही त्याची पावडर बनवू शकता तसेच दुकानातूनही आणू शकता.

या वाटीमध्ये आपल्याला काळीमिरी पावडर फक्त एक चिमूटभर घ्यायची आहे. पुढचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मध. मधाला आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्व दिले गेले आहे. यामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म सामावलेले असतात यामुळे खोकला तसेच अनेक आजार पूर्णपणे बरे केले जाऊ शकतात. तर या उपायासाठी एक चमचा मध घ्यायचा आहे तो या मिश्रणाच्या वाटीत टाकावा.

हे वाचा:   जर तुम्ही महिनाभर दररोज सकाळी एक उकडलेलं अंड खाल्लं तर काय होईल? जाणून घ्या काय म्हणतात हेल्थ एक्सपर्ट.!

आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे व एका वेळी हळूहळू चाटून खावे. असे केल्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.