आपले गुडघे हे आपले सर्वस्व असते असे आपल्याला म्हातारपणी आल्यानंतरच कळते. हसण्याचा भाग सोडा पण आजकाल गुडघे दुखी चे प्रमाण खूप वाढत चालले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपले आयुर्वेदिक शास्त्र हे समृद्ध असलेले शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील सर्व अवयव अंग यांच्या समस्या दूर करण्यासाठीचे उपाय सांगण्यात आलेले आहे.या शास्त्राचा आपण जर प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोग केला तर अनेक समस्या मुळापासून नष्ट होतील परंतु मनुष्यचा आयुर्वेदिक शास्त्रावर विश्वास नाही.
आपल्या शरीरामध्ये काहीही वेदना झाल्या तर आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. मेडिकलमध्ये जाऊन औषध सेवन करतो. या सगळ्या उपचाराने आपल्या शरीरावर लगेच फरक जाणवत असला तरी परंतु मेडिकल सायन्सने निर्मित केलेल्या औषधांचा उपयोग केल्याने शरीरावर भविष्यात गंभीर परिणाम देखील जाणवत असतात म्हणूनच आज आपण आयुर्वेदिक शास्त्रातला एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.
विशिष्ट वय झाले की आपल्या शरीरातील अनेक वेदना जोर धरू लागतात, त्यामध्ये गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांच्या वेदना,चालताना उतरतांना पायातून टकटक आवाज येणे,वाताच्या समस्या या सर्व समस्या एकामागोमाग एक उभे राहतात. या समस्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या उपाययोजना करतात परंतु फरक काही जाणवत नाही.
म्हणूनच आज आपण एक अत्यंत साधा सोपा व प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या समस्या दूर होतील. बहुतेक वेळा हातापायाच्या वेदना, हाडांचे दुखणे हे शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे देखील उद्भवत असतात. परंतु जर आपल्या शरीराला योग्य पोषक तत्व मिळाले नाही तरी या समस्या तुम्हाला होऊ शकतात म्हणूनच जर गुडघेदुखी जास्त प्रमाणात सतावत असेल तर आपल्याला एका औषधी वनस्पतीचा उपयोग करायचा आहे.
ही औषधी वनस्पती आपल्याला सहज उपलब्ध होते. ही वनस्पती गॅलरी, अंगणामध्ये लावत असतो. या वनस्पतीचे नाव आहे कोरफड. कोरफड च्या अंगी असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीरात वेदना दूर करतात त्याच बरोबर कोरफड मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. कोरफडचा उपयोग केल्याने शरीरातील र’क्तप्रवाह देखील सुरळीत होतो. हाडांमध्ये असणारे वंगण जे संपलेले आहे ते वंगण ची पुन्हा निर्मिती होऊ लागते.
तसेच कोरफड चा उपयोग त्वचा विकारांवर देखील खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि म्हणूनच आजचा उपाय देखील करण्यासाठी आपल्याला कोरफड वापरायचे आहे. कोरफड वापरल्यानंतर आपल्याला कोरफड स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे परंतु त्यापूर्वी जर कोरफड कापल्यावर पिवळा थर निघत असेल तर तो काढून टाकायचा आहे.
या पिवळ्या थरांमध्ये खूप सारे विषारी घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. आता आपल्याला कोरफड मधील गर काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद लागणार आहे. हळद ही अँटी बॅक्टेरियल आणि वेदनाशक म्हणून ओळखली जाते.हळदीचा उपयोग पूर्वीच्या काळापासून शरिरावरील कोणत्याही प्रकारची वेदना जखम भरून काढण्यासाठी केला जातो.
म्हणूनच आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्या कढाई मध्ये आवश्यकतेनुसार हळद टाकायची आहे. हळद आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. हळद जास्त प्रमाणात भाजायची नाही आणि त्यानंतर आपल्याला कोरफडचा गर मिक्स करायचा आहे. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव केल्या नंतर कोमट कोमट असतानाच आपल्या लेप गुडघ्यांवर लावायचा आहे.
ज्या ठिकाणी वेदना भरपुर प्रमाणामध्ये होत आहे अशा प्रभावी जागेवर आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या कॉटन कपड्याने आपल्याला आपला गुडघा बांधून ठेवायचा आहे. अर्धा ते एक तास कमीत कमीत आपल्याला आपल्या गुडघ्याला कपड्याने बांधून ठेवायचे आहे. अशा प्रकारे जर आपण हा उपाय नेहमी केला तर तुमच्या शरीरातील सगळ्या वेदना लवकरच दूर होतील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.