मित्रांनो आज आपण या लेखात हॉटेल स्टाईल काजू मसाला पनीर भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. हॉटेलपेक्षा छान चवीची भाजी आपण घरी तयार करू शकतो. ही भाजी बनवण्यासाठी कोणतेही वेगळे एक्स्ट्रा मसाले लागत नाही, अगदी घरगुती मसाल्यात तुम्ही ही भाजी तयार करू शकता. तर हा काजू मसाला पनीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 300 ग्राम प्रमाणात मलाई पनीर घेतले आहेत, ते आता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण कापून घेतलेले आहेत. आता मलाई पनीर घेतलं की चवीला पनीर मसाला अगदी छान लागतो.
आता 300 ग्राम जर पनीर असेल तर त्याला साधारण पन्नास टक्के प्रमाणात इथे आपण काजू घेतलेले आहे. ही भाजी चार ते पाच जण अगदी पोटभर व्यवस्थित खाऊ शकतात. आता भाजीसाठी लागणारं वाटण कसं तयार करायचं तर त्याची खरीखुरी आणि सिक्रेट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे तुमच्या घरी एखादा छोटा मोठा कार्यक्रम जर असेल तर अशीही चमचमीत भाजी तुम्ही या पासून तयार करू शकता.
तर भाजी बनवण्यासाठी आपण इकडे कढई गरम करून घेतलेली आहे, ती छान गरम झाली की यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेल आहे, तसेच तुम्ही याठिकाणी थोडसे बटर वापरले किंवा लोणी वापरले तरी सुद्धा चालेल. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यात एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घातलेला आहे. कांदा फक्त हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. 60 ते 65 टक्के आपण हा गुलाबीसर छान परतून घेणार आहोत. हे फार परतून घेऊ नका नाहीतर भाजीला थोडी कडवट चव येऊ शकते. साधारणत वीस मिनिटं गुलाबी रंगावर कांदा परतून घेतलेला आहे.
आता आपण येथे तीन लहान मध्यम छान लालभडक टोमॅटो चिरून घेतलेले आहे. या ग्रेव्हीसाठी ना टोमॅटो लाल भडक चांगले पिकलेले घ्यायचेत, म्हणजे तुमच्या वाटणाला रंग अगदी मस्त येतो. टोमॅटो सुद्धा खूप गरम करायचा नाही, हलकसं गरम करायचा आहे. टोमॅटो थोडासा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपल्याला ठेवायचा आहे, अगदी गाळ करायचा नाही, सोबतच 50 ग्रॅम प्रमाणात किंवा दहा ते बारा काजू अर्धा तासासाठी साध्या पाण्यामधे आपण भिजत ठेवलेले आहे. आपण भिजवलेले काजू पण वाटनासाठी वापरणार आहोत. ते मगाशी पनीर बरोबर तुम्हाला जे काजू दाखवले ना ते थोडे तळून आपण भाजीवर घालणार आहोत.
बनवताना पन्नास ग्राम भिजवलेले काजू वापरले आणि भाजीला वरून टाकण्यासाठी 50 ग्रॅम काजू आपण नंतर वापरणार आहोत. हे पण आपण मिनिटभर परतून घेतले आहे. दहा लसणाच्या पाकळ्या आणि खडे मसाल्याची छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि लसूण आपल्याला परतायचा नाही फक्त गरम करून घ्यायचा आहे. आता हे वाटण हलकस कोमट करून घ्यायच आहे आणि स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते काढून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर जर गरज वाटलीच तर थोडसं पाणी घालायचे आणि तुम्हाला किती बारीक वाटण हवं आहे त्यानुसार हे फिरवून घ्यायच आहे.
तर साधारण दोन तीन चमचे पाणी घालून असे हे छान बारीक वाटण तयार झालेल आहे. आता: सारखीच पळी भरून तेल कढईत टाकून आपण कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे. तेलाबरोबर थोडसं बटर घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, आणखीन चवीची भाजी तुमची तयार होईल. ते हलकसं गरम केलेल आहे. आता यामधे आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे. मध्यम आचेवर एक सात ते आठ मिनिटे याचा रंग बदलेपर्यंत आणि मासाल्यातून तेल सुटेपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत. पुढे यामधे आपण घरगुती मसाले वापरणार आहोत.
अगदी पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा स्पेशल मालवणी मसाला, तुमच्याकडे जर काश्मिरी मिरची पावडर असेल ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, सोबतच एक मोठा चमचा किंवा दोन लहान चमचे कस्तुरी मेथी घ्यायची आहे, ही मेथी हॉटेलच्या भाज्यांमध्ये घातली जाते कारण त्याने भाजीला चव येते. त्यांनतर साधारणता तेल सुटे पर्यंत एक-दोन मिनिटे आपण हा मसाला छान परतून घेतलेला आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटन तयार केलं होतं त्यातच अर्धा कप पाणी घालून ते मिश्रण आपण कढईत टाकणार आहोत. पुढे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठ घालू शकता. आता मोठ्या आचेवर या ग्रेव्हीला मस्त खदखदून आपने उकळी येऊ देणार आहोत मस्त छान उकळी आली की तुम्ही त्याचा रंग बघू शकता.
मस्त उकळी आली की यामध्ये अर्धा चमचा आपण किचन किंग मसाला घालणार आहोत, आता यावर झाकण लावून आपण हे एक दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर ठेवून देणार आहोत तर दुसरीकडे एक फोडणी पात्र घेतलेल आहे. त्यामध्ये आपण तेल घेतलेल आहे. तेल हलकसं गरम झालं की पनीर बरोबर मगाशी काजू घेतलेले होते ना ते आपल्याला मस्त खरपूस तळून घ्यायचे आहे.
आता काजुचा रंग पटकन बदलतो म्हणून ते थोडे तळून झाले की गॅस बंद करायचा आहे. तुम्ही अगोदरच काजू तळून बाजूला काढून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल. तर इथे साधारणत वीस मिनिटे झालेली आहे. शंभर टक्के तुमची ही ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे आता या स्टेजला सगळ्यात शेवटी आपल्याला पनीर घालायच आहे. याला आपण खूप शिजवत वगैरे बसायचं नाही, तसेच तळलेले काजू सुद्धा घातलेले आहेत, थोडेसे बाजूला काढून ठेवल्या वर आपण ते पुढे नंतर वापरणार आहोत.
हलक्या हाताने आपण पनीर मसाला या मध्ये छान एकजीव करून घेऊ आणि आपण गॅस बंद केला तरी चालेल. या पद्धतीने तुमचा मस्त ढाबा हॉटेल पेक्षा छान, अगदी घरगुती मसाल्यात आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत चमचमीत काजू मसाला तयार झालेला आहे. घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असेल, पाहुण्यांसाठी किंवा कधीकधी होटेल स्टाइल बेत करायचा असेल की ही रेसिपी रेकमेंडेड आहे. तर नक्की करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.